`या` अल्बममध्ये झळकणार `बिग बॉस १२` फेम दीपक-सोमी
`बिग बॉस` १२ फेम गायक दीपक ठाकूर आणि अभिनेत्री सोमी खान लवकरच एकत्र झळकणार आहेत. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या नात्यांच्या चर्चांना उधान आले होते.
मुंबई : 'बिग बॉस' १२ फेम गायक दीपक ठाकूर आणि अभिनेत्री सोमी खान लवकरच एकत्र झळकणार आहेत. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या नात्यांच्या चर्चांना उधान आले होते. दीपक आणि सोनी लवकरच एका अल्बमच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. या अल्बमचे शूटिंग सध्या गुजरात मध्ये सुरू आहे. दीपक-सोमी भजन हे दोघे सम्राट अनुप जलोटा यांच्या अल्बमच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. अनुप जलोटायांच्या ‘केसरिया बालम’ या अल्बममध्ये एकत्र झळकणार आहेत. आता या अल्बममध्ये दीपक-सोमी ही जोडी चाहत्यांच्या आवडीस उतरणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बिग बॉस सिझन 12 चा ताज दीपिका कक्कडने पटकावला. श्रीसंतला मागे टाकत दीपिका या सिझनची विजेता ठरली आहे. दीपिका आणि श्रीसंतनंतर टॉप 3 मध्ये दीपक ठाकूरचा सहभाग होता. सलमान खानने विजेता घोषित होण्याअगोदर तिघांना संधी दिली. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे दीपकला 20 लाख रुपये घेऊन अंतिम निर्णयातून बाहेर होण्याची संधी दिली. तेव्हा दीपकने 20 लाख रुपये घेऊन ही स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.