Bigg Boss चं भव्यदिव्य घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, जाणून या मागे किती हात राबतात
बिग बॉसच्या घराची रचना दरवर्षी नव्या थीमनूसार केली जाते.
Big Boss Unknown Facts: बिग बॉस 16 लवकरच (Big Boss 16) टिव्हीवर सुरू होणार आहे. या शोचा नुकताच एक प्रोमो समोर आला असून स्पर्धकाच्या नावांबद्दल सोशल मीडियावर भरपुर चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस शोचा टीआरपी सर्वात जास्त असतो पण त्याचबरोबर या शोमधील घरही जास्त आकर्षित करते.
बिग बॉसच्या घराची रचना दरवर्षी नव्या थीमनूसार केली जाते आणि यावेळी एक्वा थीमवर (Big Boss House Interior Design Theme) घराची रचना अनोख्या पद्धतीने करण्यात आल्याची माहिती आहे पण तुम्हाला माहित आहे का की बिग बॉसच्या घराचा डिझायनर कोण आहे? समोर आलेल्या बातमीनुसार, प्रत्येक सीझनमध्ये ही जबाबदारी इंटिरियर डिझायनर विनिता आणि आर्ट डिझायनर आणि तिचा पती उमंग कुमार (Vineeta and Umang Kumar) यांना दिली जाते.
विनिता आणि उमंग प्रत्येक सीझनमध्ये एकत्र बिग बॉसच्या घराची रचना करत असतात. त्याचबरोबर हे घर इतक्या सहजासहजी तयार होत नसून 6 महिने अहोरात्र मेहनत आणि 500 ते 600 मजुरांच्या मदतीने हे घर तयार होते आणि मगच तुम्हाला भव्यदिव्य असे सुंदर घर दिसते.
या घरात राहण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्याच्यासाठी विशेष खर्च लागतो. तेव्हा एका दिवसासाठी वीज, पाणी आणि जेवणाचा खर्च सुमारे 15-20 हजार असा येतो. हा खेळ 24 तास आणि सात दिवसांचा असल्याने यासाठी रोज एक युनिट 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करते.
यादरम्यान शिफ्टमध्ये 250-300 क्रू मेंबर्स काम करतात. जे स्पर्धकांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवतात. बिग बॉसच्या घरात 90 हून अधिक कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते. म्हणजेच कोणत्याही कोनातून स्पर्धकांना टाळणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे.
तुम्हाला माहिती आहे का की बिग बॉसचे घर मुंबईत आहे आणि तेही फिल्मसिटीमध्ये (Goregaon Filmcity). सुरुवातीच्या अनेक सीझनमध्ये बिग बॉसचे हे घर मुंबईपासून काही अंतरावर लोणावळ्यात होते. पण नंतर हे घर गोरेगाव आणि आता फिल्मसिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.