Big Boss actresses Bikini Looks: बिग बॉस (Big Boss) हा लोकप्रिय टेलिव्हिजन शो नेहमीच सगळीकडे धुमाकूळ घालत असतो. आता पुन्हा एकदा या शोची चर्चा आहे कारण बिग बॉस 16 (Big Boss 16 On Air) सुरू झालं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र बिग बॉस ट्रेन्डिंग आहे. बिग बॉस ही मालिका त्याच्या बोल्ड आणि कॉन्ट्रोव्हर्शिल आशयासाठी ओळखली जाते. (Big Boss Controversial) या शोमध्ये वाट्टेल त्या गोष्टींना पडद्यावर आणले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात. या अभिनेत्रींनी बिग बॉसमध्ये त्यांच्या स्टाईलिश आणि हटके लुकनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. (Actresses Hot and Bold Style in Big Boss Show)


तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)
तेजस्वी प्रकाशने स्टायलिश पावडर ब्लू बिकिनीसह बिग बॉस 15 मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वरागिनी मालिकेतून तिनं आपल्या चाहत्यांना प्रभावित केले होते आजही तिची भुमिका सर्वत्र लोकप्रिय आहे. तिचा हा लुक सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. 



जसलीन मथारू (Jasleen Matharu)
बिग बॉस 12 मध्ये जसलीन मथारू अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. घरात तिनं डार्क पिंक कलरची बिकीनी घालून चाहत्यांचे लक्ष वेधले होते. सीझनमधील सर्वात हॉट स्पर्धक म्हणूनही तिची प्रशंसा झाली परंतु संगीतकार अनुप जलोटा यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळेही ती अधिक चर्चेत होती.


हिना खान (Hina Khan)
बिग बॉस 11 मध्ये हिना खानने काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये सर्वांचे लक्ष तिच्याकडे वळवले होते. बिग बॉसचं ते पर्व तिनं पुर्णतः गाजवले होते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टेलिव्हिजन शोमध्ये तिला फक्त साडी आणि सूटमध्ये पाहिलेल्या तिच्या चाहत्यांसाठीही तिला मोनोकिनीमध्ये पाहणं सर्वांसाठीच आश्चर्यचकित करणारे होते.



लोपामुद्रा राऊत (Lopamudra Raut)
बिग बॉस 10 मध्ये ब्युटी क्वीन लोपामुद्रा राऊतने काळ्या बिकिनी परिधान करत घरातील तापमान वाढवले ​​होते  लोपामुद्राने तिच्या फॅशनेबल कपड्यांच्या चॉईसमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. लोपामुद्रा ही एक मराठी मुलगी आहे. 


मोनालिसा (Monalisa)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने बिग बॉस 10 मध्ये बिकीनी घातली होती. तिने लाइम आणि लाल रंगाची बिकिनी घातली होती. बिकीनी घालून तिनं स्विमिंग पूलमध्ये मस्त वेळ स्पेंड केला होता.