मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझ रेव्ह पार्टीतून अटक केली. चौकशी दरम्यान अरबाज मर्चंटकडून सहा ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे, त्यानंतर आर्यन खान देखील निशाण्यावर आला आहे.  आर्यन आणि अरबाजला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे याप्रकरणी आता अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट यांनी मौन सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असलम मर्चंट एक वकील आहेत. आर्यन आणि अरबाज ड्रग्सकेस प्रकरणी ते म्हणाले, 'आर्यन आणि अरबाज लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही पहिल्यांदा क्रूझने गेले. दोघांनाही ट्रिपचे आमंत्रण मिळाले होते. त्यांच्याकडे क्रूझची तिकिटेही नव्हती. आर्यन जेव्हा सुट्टीसाठी भारतात यायचा, तेव्हा ते दोघेही ट्रिपसाठी जायचे.'


असलम मर्चंट पुढे म्हणाले, 'अनेक वेळा दोघेही शाहरुखच्या फार्म हाऊसवर गेले. दोघेही एकत्र दुबईला गेले. अरबाजला माहित नाही मुनमुन कोण आहे. ती आर्यनची मैत्रीण आहे. अरबाज 25 वर्षांचा आहे. तो एक चांगला मुलगा आहे. तो कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो. आम्ही देशातील टॉप डीलर्सपैकी एक आहोत ...'


अखेर अरबाजचे वडील आणि वकील असलम यांनी कायद्या विश्वास व्यक्त करत आर्यन आणि अरबाज लवकरचं या अडचणीतून बाहेर येतील असं देखील म्हणाले आहे. पण अद्याप आतापर्यंत अभिनेता शाहरूख खानची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.