मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलचा विवाह सोहळा अखेर पार पडला. तुफान रंगलेल्या चर्चांनंतर बॉलिवूडची कॅट अखेर Mrs. Kaushal झाली. अत्यंत शाही पद्धतीत जयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडला. विकी - कतरिनाने ठरावीक पाहुण्यांना लग्नाचं आमंत्रण दिली. महत्त्वाचं म्हणजे कतरिनाने एक्स बॉयफ्रेन्ड आणि अभिनेता सलमान खानला देखील आमंत्रण दिलं नव्हतं. 
 
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची सुरक्षा कंपनी 'टायगर सिक्युरिटी' सिक्स सेन्स फोर्टच्या संरक्षणासाठी होती. एका मुलाखतीत बहीण अर्पिता खान शर्माने कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. लग्नाला आमंत्रण दिलं नसलं तरी अर्पिताने विकी-कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अर्पिताने विकी-कतरिनाचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, 'विकी-कतरिना तुम्हाला मनापासून शुभेच्छा... तुम्हा दोघांनाही आयुष्यभर आनंद मिळो.' सध्या अर्पिताची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्पिता व्यतिरिक्त अनेक कलाकारांना विकी-कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.