मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेटचं नातं तसं खूप जुनं आहे. या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांचे एकमेकांशी काही ना काही नातं आहे. त्यामुळे अशा जोडप्यांची नेहमीच चर्चा होत असते. मग ते नातं काही वर्षांपूर्वीचं असू दे किंवा आताची असू देत. सध्या अशाच एका क्रिकेट आणि बॉलिवूडशी संबंधीत जोडीची सोशल मीडियावरती चर्चा होत आहे. ही चर्चा प्रसिद्ध स्टार सैफ अली खानच्या पहिली पत्नी अमृता सिंगच्या नात्याची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडच्या जगात अशा अनेक प्रेमकथा आहेत, ज्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत परंतु लोकांनी त्यांना नेहमीच लक्षात ठेवले आहे. अशीच एक जोडी आहे अमृता सिंग आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रवी शास्त्री यांची


1980 मध्ये रवी शास्त्री आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात आकर्षक आणि स्टार खेळाडू  होते आणि याच कारणामुळे लोकांनी त्यांना क्रिकेट संघाचा 'पोस्टर बॉय' बनवले होते.


रवी शास्त्री यांच्या मनमोहक व्यक्तिमत्त्वामुळे अमृताचा देखील त्यांच्यावरती जीव जडला होता.


या दोघांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. सामन्यादरम्यान अमृता रवी शास्त्रीला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचायची. दोघांची जवळीक तेव्हा चर्चेत आली जेव्हा दोघे एका मॅग्जीनच्या फ्रंट पेजवर एकत्र दिसले. त्यानंतर मात्र रवी आणि अमृताचे अफेअर 80 च्या दशकातील सर्वात चर्चेत असलेले अफेअर बनले.



काही वर्षांनी त्यांच्यातील नातं अधिक मजबूत होत गेलं आणि संपूर्ण जगाला त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. काही काळ डेट केल्यानंतर 1986 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली, पण नशीबत काही वेगळंच होतं.


कारण साखरपुडा होऊन देखील हे जोडपे लग्न बंधनात अडकू शकले नाही.


रिपोर्टनुसार, रवी शास्त्री एका मुलाखतीत म्हणाले होते की, "मला कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न करायचे नाही. माझ्या पत्नीचे पहिले प्राधान्य तिचे करिअर नसून माझे कुटुंब असावे." म्हणून असे म्हटले जात आहे की, याच कारणामुळे हे नातं तुटलं असावं.


रवी शास्त्रींच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना अमृता तात्काळ म्हणाली- "सध्या मी माझ्या करिअरमुळे हे नाते पुढे करू शकत नाही. पण मला खात्री आहे की, काही वर्षांनी मी पूर्णवेळ आई आणि पत्नी होईल."


अशा प्रकारे ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली. त्यानंतर सगळं विसरून रवी शास्त्रीने 1990 मध्ये रितूशी लग्न केले. तर 1991 मध्ये अमृता सिंगने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. मात्र, काही वर्षांनी अमृता आणि सैफचेही मार्ग वेगळे झाले.