ICU मध्ये असलेल्या लता दीदींबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर
लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आणि भारताची गाण कोकीळा लता मंगेशकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली, यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय गायीका लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
लता मंगेशकर आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती डॉ प्रतीत समदानी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे. आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. असं देखील डॉक्टर म्हणाले.
याआधी डॉ. प्रतीत समदानी यांनी एनएनआयशी बोलताना सांगितले होतं की, लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनिया देखील झाला आहे. त्यामुळे त्याचं वय लक्षात घेऊन काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना 10 ते 12 दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करत आहेत.
काही दिवसांपूर्वी वॉर्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, लता मंगेशकर तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आल्या होत्या, परंतु येथे उपचारादरम्यान त्यांना कोविडची लागण झाली.