मुंबई : बिग बॉस 11 मधील हिना खानचा आज 31 वा वाढदिवस. हिना खानने टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहता है' मध्ये अक्षराची भूमिका साकारली होती. हिना खानने बेमन इथून मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत हिना खानच्या अपोझिट करण मेहरासोबत काम केलं. या दोघांनी 8 वर्ष कधी एकमेकांशी संवाद केला नाही. हिना खान बिग बॉसच्या घरात देखील बोलली नाही. तर करण बिग बॉस 10 चा स्पर्धक होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिना खान बिग बॉस सिझन 11 ची रनर अप होती. बिग बॉसच्या घरात हिना खान आपल्या कमेंट्स आणि वागणुकीमुळे खूप चर्चेत आहे. सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी तिला भरपूर त्रास दिला. बिग बॉसच्या अंतर्गत हिना खानने गौहर खान, साक्षी तंवर, ऋत्विक धनजानीवर भरपूर कमेंट्स केले होते. एवढंच नाही तर साऊथच्या फिल्म आणि अभिनेत्रींवर कमेंट केले आहेत. हिना खान टीव्ही इंडस्ट्रीमधील हायएस्ट पेड अॅक्ट्रेस आहे. हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है यासाठी एका एपिसोडकरता 1 ते 1.25 लाख रुपये फी आकारत असे. 


बिग बॉसनंतर हिना टीव्ही आणि सिनेमा इंडस्ट्रीपासून लांब राहिली. मिळालेल्या माहितीनुसार ती, कसोटी जिंदगी की च्या दुसऱ्या सिझनमध्ये कमोलिकाचं कॅरेक्टर साकारणार होती. हिना कायम रॉकी जयसवालसोबत आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करतो.