शिल्पा शिंदेने परत घेतला लैंगिक छळाचा खटला, `भाभी जी...`च्या निर्मात्यावर केला होता आरोप
टीव्हीसारख्या छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे म्हणजे चर्चीत नाव. नुकतीच ती `बिग बॉस`ची ११व्या पर्वाची विजेती ठरली. दरम्यान, पुन्हा एकदा ती लैंगिक छळ प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : टीव्हीसारख्या छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे म्हणजे चर्चीत नाव. नुकतीच ती 'बिग बॉस'ची ११व्या पर्वाची विजेती ठरली. दरम्यान, पुन्हा एकदा ती लैंगिक छळ प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
मालिकेने शिल्पाला प्रचंड लोकप्रियता
दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, तिने 'भाभीजी घर पर हैं'च्या निर्मात्याविरोधात न्यायालयात दाखल केलेला लैंगिक छळाचा घटला मागे घेतला आहे. तिने गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात हा खटला न्यायालयात दाखल केला होता. दरम्यान, 'भाभी जी घर पर हैं' मालिकेने शिल्पाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ती घरा घरात पोहोचली. भाभी जी हे जणू तिचे टोपण नावच बनले. दरम्यान, या मालिकेच्या निर्मात्याने तिच्यावर अनप्रोफेशनल अल्याचा आरोप केला होता. तर, त्यानंतर शिल्पाने प्रोड्युसर बेनिफरचा पती संजय कोहलीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
टीव्ही प्रोड्युसर असोशिएशनने केले बॉयकॉट
दरम्यान, शिल्पाने संजय कोहलीवर गैरफायदा घेतल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आपल्या आरोपामध्ये शिल्पाने असेही म्हटले होते की, घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करून नकोस. अन्यथा, तुला शोमधून बाहेर काढले जाईल, अशी धमकी संजयने आपल्याला दिली होती.
दरम्यान, 'भाभी जी...' सोडल्यावर बेनिफरसोबतचा शल्पाच्या संघर्षाने टोक गाठले होते. इतके की, टीव्ही प्रोड्युसर असोशिएशनने तिला बॉयकॉट केले होते.