मुंबई : देशातील सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस 12' ला 16 सप्टेंबरपासून धमाकेदार सुरूवात झाली. या शोमध्ये कोण स्पर्धक असणार या प्रश्नाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. यावर्षी बिग बॉस 12 मध्ये स्पर्धकांमध्ये अनेक जोड्यांचा समावेश आहे. तसेच यावर्षी बिग बॉस 12 मध्ये खूप मोठा खुलासा झाला आहे. जो सर्वांनाच धक्कादायक आहे. खरं म्हणजे बॉलिवूडमध्ये याबाबत कुणालाच काही माहित नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस 12 च्या घरात आठवे स्पर्धक म्हणून भजन सम्राट अनूप जलोटा यांनी सहभाग घेतला आहे. या ठिकणी अनूप जलोटा एका मुलीसोबत आले होते. ज्या मुलीचं नाव जसलीन मथारू. मिळालेल्या माहितीनुसार, अनूप यांच्या वयापेक्षा 37 वर्षे लहान असलेली ही मुलगी. हे दोघे गेले साडे तीन वर्षे एकमेकांना डेट करत आहे. ही गोष्ट एकताच सलमान खान देखील आश्चर्यचकीत झाला.  



जसलीनने केला मोठा खुलासा या कार्यक्रमात जसलीन म्हणाली की, आम्ही आमच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदाच असा सार्वजनिक ठिकाणी खुलासा केला आहे. एवढंच काय तर हे माझ्या पालकांना आणि मित्र परिवाराला देखील धक्कादायक असणार आहे. एकमेकांना डेट करून साडे तीन वर्षे झाली आहेत. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना जसलीनने जबरदस्त डान्स सादर केला आणि सगळ्यांची मने जिंकली.


बिग बॉस 12 च्या घरात सर्वात मोठा खुलासा


37 वर्षे लहान असलेल्या या मुलीला डेट करतायेत अनूप जलोटा 


बिग बॉसच्या घरात अनूप जलोटा यांनी आपलं भजन 'ऐसी लागी लगन...' यावर एन्ट्री केली. आणि संपूर्ण वातावरण भक्तीमय केलं. जेव्हा अनूप जलोटा यांनी आपल्या नात्याबद्दल सलमानसमोर खुलासा केला तेव्हा सलमानने चक्क डोकं पडकलं. आणि यानंतर अनूप आणि जसलीनने घरात प्रवेश केला.