मुंबई  : सलमान खानचा लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस' सिझन 12 ची  16 सप्टेंबर रोजी सुरूवात झाली. या दिवसाची सुरूवात अतिशय ग्रँड झाली. यावर्षी या सिझनमध्ये Singles v/s Doubles या रुपात हा खेळ खेळला जाणार आहे. या शोमध्ये यंदा नेहा पेंडसे देखील भाग आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहाने अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या हटके आणि बोल्ड अंदावर चाहते अतिशय घायाळ आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर नेहाचे अनेक चाहते आहेत. नेहाच्या प्रत्येक गोष्टी चाहत्यांसाठी खास असतात. असाच एक नेहाचा व्हिडिओ सध्या चाहत्यांच्या पसंतीला पडत आहे. या व्हिडिओत नेहा पोल डान्स करत आहे. 



आपल्या फिटनेसबाबत नेहा अधिक जागृत आहे. नेहा मोकळ्या वेळेत पोल डान्स करताना दिसते. इंटरनेटवर तीचा हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. पोल डान्स शिकतानाचा हा व्हिडिओ आहे.