ड्रेसला इतके कट्स असलेला व्हिडीओ अभिनेत्रीनं केला शेअर, ठरतोय चर्चेचा विषय
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
मुंबई : 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळी ही तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. प्रत्येक वेळी निक्की असा ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर येते की तिची स्टाईल पाहून चाहते बेभान होतात. नुकताच निक्कीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निक्कीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निक्कीनं लाल रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. निक्कीचा हा रिव्हिलिंग ड्रेस असून त्याला थाय स्लिट देखील आहे. या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी भिंतीला लागून वेगवेगळ्या बोल्ड पोझ देत आहे, ज्याला पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने लाइट मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना निक्कीनं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या दिवशी राणीचा जन्म झाला. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' अभिनेत्रीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
बिग बॉसमध्ये असताना निक्कीनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. प्रेक्षकांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी निक्की एक होती.