मुंबई : बिग बॉस 15 मध्ये, लव्ह बर्ड्स मायशा अय्यर आणि ईशान सहगल हे त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे बरेच चर्चेत होते. या शोदरम्यान दोघांच्या रोमान्सची बरीच चर्चा झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांच्या प्रेमात असलेले ईशान आणि मायशा अनेकदा शोमध्ये असलेले कॅमेरे विसरले आणि शोमध्ये एकमेकांच्या जवळ जाताना दिसले. पण आता एका नवीन व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा एकदा दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली आहे.


हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये मायशा-ईशान रोमँटिक


बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मायशा आणि ईशान उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता दोघे एका हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये इंटिमेट होताना दिसले आहेत.


खुद्द माईशाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ईशानसोबतचा तिचा रोमँटिक आणि सुपर सिझलिंग व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ समोर येताच, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या जोडप्याची रोमँटिक केमिस्ट्री पाहून चाहते पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये मायशा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहे, तर इशान ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. दोघांनी एकमेकांचा हात धरून व्हिडिओची सुरुवात होते आणि नंतर जसजसा व्हिडिओ पुढे जातो तसतशी दोघांची जवळीकही वाढत जाते.


व्हिडिओमध्ये इशान मायशासोबत रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहे आणि मायशाही ईशानच्या प्रेमात बुडलेली दिसत आहे.