Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर सलमान खान भडकला, म्हणाला- `माझी आई-बहीण बाथरूममध्ये असती, तर ...`
बिग बॉस 15 ची सुरुवात दणक्यात झाली आहे
मुंबई : बिग बॉस 15 ची सुरुवात दणक्यात झाली आहे आणि सीझनवर प्रतिक सहजपालचं वर्चस्व आहे. जो बिग बॉस ओटीटीचा स्पर्धक होता. अलीकडेच, त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे, प्रतीक सहजपालने काहीतरी केलं. ज्यामुळे त्याला केवळ कुटुंबातील सदस्यांच्याच नव्हे तर प्रेक्षकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. आणि आता असं दिसत आहे की, प्रतीक सहजपाल या वीकेंड का वार मध्ये होस्ट सलमान खान कडून खूप फटकार घेणार आहे.
बिग बॉस 15च्या पहिल्या वीकेंड का वरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात शोचा होस्ट सलमान खान प्रतीक सहजपालचा क्लास घेताना दिसत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान प्रतीक सहजपाल आणि विधी पंड्या यांच्यामध्ये बाथरूमच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहे आणि प्रतीकवर चिडताना दिसत आहे. ज्यावरून दिसून येत आहे की, सलमान खान बाथरूमच्या या घटनेमुळे खूप भडकला आहे.
प्रतीक सहजपालकडे बोट दाखवत सलमान खान म्हणाला की, 'जर कोणी सांगितलं असतं की, माझी आई आणि बहीण बाथरूममध्ये आहेत. तरी मी खेळासाठी ते केले असतं. म्हणजे आई आणि बहीणपेक्षा गेम खूप महत्वाचा आहे. जर विधीने ठरवलं असतं तर तिने तुझी वाट लावली असती. जर माझी आई-बहीण असती. तर मी तुझी...''
वास्तविक, प्रकरण असं आहे की, विधी पंड्या गार्डन परिसरातील वॉशरूममध्ये आंघोळ करत आहे आणि या दरम्यान प्रतीक सहजपालने बाहेरून वॉशरूमच्या दाराची कडी तोडली. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर विधी करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुशाली आणि इतर सर्वांकडे तक्रार करते. ज्याने कौटुंबिक सदस्यांना राग येतो. एवढंच नाही तर प्रतीक सहजपालच्या या कृत्यामुळे प्रेक्षकही खूप नाराज झाले आहेत.