मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. 'बिग बॉसचं 16' (Bigg Boss !6) पर्व सुरु आहे. या शोमधील गोंडस स्पर्धक अब्दु रोजिकनं सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. अब्दूचा खोडकर स्वभाव हा फक्त प्रेक्षकांना नाही तर बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्याही पसंतीत उतरला आहे. दरम्यान, अभिनेत्री आणि राजकारणी अर्चना गौतम वारंवार अब्दूच्या लहानशा उंचीची खिल्ली उडवत आहे. 


आणखी वाचा : 'मतलब कुछ भी...' सोनू सूद रेल्वे स्टेशनवरील पाण्याला सुपर हेल्दी म्हटल्यामुळे झाला ट्रोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अर्चना गौतम सकाळी घरातील इतरांशी बोलताना दिसली. यादरम्यान, अब्दू बद्दल बोलताना अर्चना म्हणाली, 'यार वो छोटू को बोल दो, इंग्लिन में...' अर्चना तिचं वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात शालीन भनोट मध्ये येऊन म्हणाला, अब्दूच्या नावाची चेष्टा करू नको.'


शालीन अर्चनाला अब्दूला छोटू म्हणून नाही तर त्याच्या नावाने हाक मारायला सांगतो. शालीनच्या या वक्तव्यावर अर्चना म्हणाली, 'कौन सा लंगूर बोल दिया...' (लंगूर म्हणजे वानर) अर्चनाचं हे बोलणं तिथे उपस्थित असलेल्या इतर स्पर्धकांना आवडलं नाही. या सर्वांनी अर्चनाच्या बोलण्यावर आक्षेप घेत अब्दूला त्याच्या नावानेच हाक मारावी, असे म्हटले आहे.


आणखी वाचा : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर पहिल्यांदा राज कुंद्राचा चेहरा समोर, ट्रोलर्स म्हणाले, 'अरे फेस शील्ड...'


याआधीही प्रीमियर डेच्या दिवशी अर्चना अब्दूच्या उंचीची खिल्ली उडवताना दिसली होती. घरात प्रवेश केल्यानंतर अर्चनाने अब्दुला दिसत नसल्याचे म्हटले होते. अभिनेत्री इथेच थांबली नाही. तिनं अब्दुच्या उंचीचीही खिल्ली उडवली आणि सांगितलं की त्यानं वेगळा बेड घेतला हे चांगले आहे नाहीतर मध्यरात्री कोणीतरी त्याला लाथ मारली असती. हे बोलल्यावर अर्चना जोरजोरात हसायला लागते.


अर्चना आपली चेष्टा करतेय हे अब्दूला समजत नाही, कारण अब्दूला हिंदी येत नाही. मात्र, अब्दू आता एकटा नाही, संपूर्ण देश अब्दूच्या समर्थनार्थ उभा आहे. अशा परिस्थितीत अब्दूची खिल्ली उडवल्याबद्दल लोकांनी अर्चनाला ट्रोल केलं. अनेकांनी अर्चनाला शोमधून बाहेर काढण्याची मागणीही केली होती. लोकांचा राग शांत झाला नव्हता आणि आता पुन्हा अर्चना अब्दुची खिल्ली उडवताना दिसली. (bigg boss 16 archana gautam again make fun of abdu rozik s height calls him chhotu) 


आणखी वाचा : 'लग्नाच्या काही महिन्यांनंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम 'प्रिन्सची' फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत


अब्दूची चेष्टा करणं अर्चनाला महागात पडू शकतं. कारण या आठवड्यात अर्चनाला नॉमिनेट करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक अर्चनावर नाराज आहेत. अर्चना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अशा स्थितीत तिला प्रेक्षकांचा पाठिंबा कसा मिळणार हाही प्रश्न आहे. आता वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खान अर्चनाला तिच्या या कृतीबद्दल काय सल्ला देतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.