मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या नवा सीझनला सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री त्याचा भव्य प्रीमियर झाला. ज्यामध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी 'बिग बॉस'च्या (Bigg Boss 16) घरात प्रवेश केला होता. या सेलिब्रेटीमध्ये एका अशा स्टारने एन्ट्री घेतलीय, जिने आतापर्यत 'बिग बॉस'मध्ये सर्वाधिक मानधन घेतले आहे. ही अभिनेत्री कोण आहे ती जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस'मध्ये इतर कलाकारांप्रमाणे टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीरने (Sumbul Touqeer) देखील प्रवेश केला आहे. या प्रवेशासह सुंबूल ही या हंगामातील सर्वात तरुण स्पर्धक ठरली आहे. 'इमली'च्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली होती. ती सध्या टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. 


किती फिस घेतेय? 
सुंबूल तौकीर (Sumbul Touqeer) ही बिग बॉसच्या 16 व्या सीझनसाठी सर्वाधिक मानधन घेणारी कंटेस्टंट ठरली आहे. तिला सर्व स्पर्धकांपेक्षा जास्त फी मिळाली आहे. सुंबुल तौकीरने तेजस्वी प्रकाशला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुंबुल प्रत्येक आठवड्यासाठी 12 लाख रुपये आकारत आहे. ती सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे. त्याचवेळी तेजस्वीला बिग बॉस 15 मध्ये प्रत्येक आठवड्यासाठी 10 लाख रुपये मिळत होते. 


बिग बॉस 16 च्या भव्य प्रीमियरमध्ये सुंबुलने (Sumbul Touqeer) सलमान खानला (Salman khan) प्रभावित केले होते. सलमानला तिचे चातुर्य आणि एनर्जी खूप आवडली होती. इतकंच नाही तर सुंबुलने वडिलांनी लिहिलेली एक कविताही स्टेजवर ऐकवली होती आणि याचदरम्यान तिचे वडीलही आपल्या मुलीसोबत प्रीमियरला पोहोचले होते.


दरम्यान सुंबूल तौकीरने  (Sumbul Touqeer) 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेतून इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. मात्र तिला 'इमली' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.ती आता केवळ 18 वर्षांची आहे. पण तिने छोट्या पडद्यावर फार कमी वेळात आपला ठसा उमटवला आहे.