मुंबई : बिग बॉसचा 16 वा (Bigg Boss 16) सीझन सुरु होण्यास अवघे काही तास उरले आहेत. उद्या शनिवारी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्हीवर हा शो दाखवला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान आम्ही तुम्हाला अशा कंटेस्टंटची नावे सांगणार आहोत, ज्यांनी बिग बॉसची (Bigg Boss) ट्रॉफी उंचावली, मात्र तरी हे स्पर्धक लाईमलाईट टीकवू शकले नाहीत. कोण आहेत हे कंटेस्टंट ते जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल रॉय
बिग बॉस  (Bigg Boss) पहिल्या सीझनचे विजेतेपद आशिकी फेम राहुल रॉयने (Rahul roy) पटकावले. कोणत्याही शोचा पहिला सीझन नेहमीच खास असतो. बिग बॉसनंतर त्याला जे यश मिळायला हवे होते ते मिळाले नाही. हा शो जिंकल्यानंतर राहुलला 1 कोटी इतकी मोठी रक्कम मिळाली होती. 


आशुतोष कौशिक
रोडीज फेम आशुतोष कौशिकने (Ashutosh kaushik) त्याच्या नावावर दोन रिअॅलिटी शो जिंकले आहेत. रोडीज नंतर त्याने बिग बॉस 2 मध्ये भाग घेतला आणि तो देखील जिंकण्यात यशस्वी ठरला. आशुतोषने अभिनयात हात आजमावला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. नंतर तो आपल्या गावी परतला. तो सध्या स्वतःचे रेस्टॉरंट चालवतो.


 


आणखी वाचा : सलमान खानने शकिरा सोबत लावेल ठूमके, VIDEO पाहिलात का तुम्ही?


 


जुही परमार
जुही परमार (juhi parmar) टीव्हीची बहू म्हणून ओळखली जाते. जुहीने बिग बॉस सीझन 5 जिंकले. शो जिंकल्यानंतर जुही इंडस्ट्रीपासून दूर झाली. ती यूट्यूबवर तिचा ब्लॉग चालवते.


मनवीर गुर्जर
मनवीर गुर्जर (Manveer Gurjar) हा पहिला विजेता होता जो सेलिब्रिटी नव्हता. मनवीरला शोमध्ये सगळ्यांनी खूप पसंत केले होते. मनवीर हा व्यवसायाने शेतकरी आहे. बिग बॉस 10 जिंकल्यानंतरही तो आपली लोकप्रियता राखू शकला नाही.


दीपिका कक्कड
बिग बॉस 12 चा हा सीझन ससुराल सिमर का फेम दीपिका कक्कडने (dipika kakar) जिंकला होता. बिग बॉस जिंकल्यानंतर ती काही शोमध्ये दिसली पण त्यानंतर ती टीव्हीपासून दूर गेली. दीपिका तिचे स्वतःचे YouTube चॅनल देखील चालवते जिथे ती तिचे दैनंदिन जीवन शेअर करत असते.


दरम्यान बिग बॉसचा 16 वा (Bigg Boss 16)  सीझन सुरू होण्यास अवघे तास उरले आहेत. त्यामुळे या शोची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.