मुंबई : सध्या बिग बॉस १७ हा सीझन चांगलाच गाजत आहे. या सीझनमध्ये अनेकांची मैत्री गाजतेय तर अनेकजण मात्र या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सध्या हा शो फिनालेच्या वाटेवर आहे. कोरियन स्टार ऑरा शोमधून बाहेर पडल्यानंतर, गेल्या आठवड्यातच, वाईल्ड कार्ड एन्ट्री समर्थ जुरेलला कमी वोट्स मिळाल्याने बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमधून बाहेर पडल्यानंतर मनारा चोप्राला आपली बेस्ट फ्रेंड म्हटल्यावर सलमान खानच्या शोमध्ये  अभिषेक कुमारच्या एन्ट्रीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.  बिग बॉस 17 मध्ये समर्थ अभिषेकला त्याच्या मानसिक आरोग्यावर सतत प्रश्न विचारत होता. बिग बॉस 17 मध्ये तो सतत अभिषेक कुमारला त्याच्या मानसिक आरोग्याबाबत प्रश्न विचारत त्याला भडकावलं. मात्र शोमधून बाहेर काढल्यानंतर, तो बाहेर आला आणि अभिषेकच्या मानसिक आरोग्याबद्दल अभिनेता बोलला आणि आता शोमध्ये एविक्ट झाल्यानंतर बाहेर आल्यावर त्याने अभिनेत्याच्या मेंटल हेल्थवर भाष्य केलं आहे.


समर्थ जुरेलने अभिषेक कुमारच्या मेंटलवर केलं भाष्य
बिग बॉस १७ मध्ये लास्ट विकेंडवर समर्थ जुरेलला अभिषेक कुमारला 'बाप का मेंटल बेटा' म्हटलं गेल्यामुळे होस्ट सलमान खानने विकेंड का वारमध्ये चांगलाच क्लास घेतला होता. कमी वोट्स मिळाल्यावर जेव्हा तिथे बिग बॉस १७ मधून बेघर झाला . तर त्याने शोमधील त्याच्या चूकांपासून ते सगळ्यांच्यां गेमवर खुवकर वक्तव्य केलं आहे. 


यावेळी त्याने अभिषेक कुमारच्या मानसिक आरोग्याबाबतही सांगितलं आहे. बॉलिवूडलाइफ डॉट कॉमशी बोलताना समर्थ जुरेल म्हणाले, हा मी प्रोवोकिंग आणि पोकिंग केलं होतं. मात्र असं करण्यामगे माझी स्वत:ची काही कारणं होती. ज्यात त्याने ईशालासाठी वाईट गोष्टी बोलल्या होत्या. ती माझ्या मनातून जात नव्हती. तो माझा राग होता. जो अशाप्रकारे बाहेर आला. मला माहित आहे की, कुणाच्या मेंटल हेल्थवर बोलणं  खूप चुकीचं आहे. मी चुकीचा होतो आणि मला या गोष्टीची जाणीव आहे. 28 जानेवारी 2024 रोजी सलमान खानच्या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.तेराव्या आठवड्यानंतर, 14 व्या आठवड्यासाठी नामांकन यादी देखील समोर आली आहे आणि या आठवड्यात ज्या स्पर्धकाला बिग बॉस 17 मधून बाहेर काढण्याची सर्वाधिक शक्यता आहे तो विकी जैन आहे.