बिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?
Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.
Munawar Faruqui Net Worth: बिग बॉस-17 ची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी यांनी अंतिम पाचमध्ये स्थान मिळविले आहे. सलमान खानच्या या प्रसिद्ध रिॲलिटी शोच्या विजेत्याची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. मुनावर फारुकी हा या शोचा प्रबळ विजयी दावेदार मानला जात आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी बिग बॉस-17 मध्ये प्रवेश केलेल्या मुनावर फारुकीने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.
गुजरातमधील जुनागढ येथे जन्मलेल्या मुनावर फारुकीचे सुरुवातीचे आयुष्य अत्यंत गरिबीत गेले. इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो कुटुंबाच्या कामात मदत करू लागला. त्यांने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आजी आणि आईसोबत चकली आणि समोसे विकण्यासारखी अनेक कामे त्याने केली. एवढेच नव्हे तर मुनावरने भांड्याच्या दुकानात सेल्समन म्हणूनही काम केले. त्याने ग्राफिक डिझायनिंगचा कोर्सही केला आहे. मुनावरने 2017 मध्ये ओपन माइकमध्ये स्टँड-अप कॉमेडी करायला सुरुवात केली.
2021 मध्ये इंदूरमध्ये अटक
मुनावरने बिग बॉसमध्ये अनेक टास्क जिंकून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र सुरुवातीपासून वादाने त्याची पाठ सोडली नाही. शोदरम्यान आयशा खानसोबतचे त्याचे नाते चर्चेत होते. स्टँड-अप कॉमेडियन, रॅपर आणि लेखक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या मुन्नावरला 2021 मध्ये इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती. त्याने 2017 मध्ये जास्मिनशी लग्न केले पण दुर्दैवाने 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
मुनावरची एकूण संपत्ती आणि उत्पन्न किती आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मुनावर फारुकी यांच्याकडे सुमारे 8 कोटी रुपयांची संपत्ती आहे. स्टँड-अप कॉमेडी हा त्याच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत आहे. इंग्रजी जागरणने याबद्दल माहिती दिली आहे. एका कॉमेडी शोसाठी मुनावर तीन ते चार लाख रुपये घेतो. याशिवाय तो त्याच्या यूट्यूब चॅनलवरून दरमहा 8 लाख रुपयांहून अधिक कमावतो. इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टसाठी मुनावर 15 लाख रुपये आकारतो. बिग बॉस रिॲलिटी शोच्या टॉप-5 जिंकल्यास त्याच्या संपत्तीत आणखी वाढ होऊ शकते.