मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. गेल्यावर्षी अंकिता लोखंडेने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. हा शाही विवाहसोबहळा सगळ्यांच्याच कायम लक्षात राहिल असा होता. विकी जैन आणि अंकिता हे अनेकांचं आवडतं कपल आहे. सोशल मीडियावर हे कपल नेहमीच चर्चेत असतं. सध्या ही जोडी 'बिग बॉस 17' गाजवत आहे. सध्या हा सीझन चर्चेचा विषय ठरत आहे. तर विकी जैन हा सर्वात चर्चेत असणारा कंटेस्टंट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच समोर आलेल्या ताज्या एपिसोडमध्ये विकी आणि अंकिताच्या विरोधात घरातील बाकीचे सदस्य एकत्र आले याचबरोबर या कपलला विशेष वागणूक का दिली जाते असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. नुकताच या जोडीने हेअर स्पा केला त्यामुळेच घरातील सगळे सदस्य चांगलेच संतापले होते. नील भट्टने खुलासा करत विकी जैनचे केस बनावट असल्याचा दावा केला. 


नील भट्टने धक्कादायक दावा करत सांगितलं की, विक्की जैनला केस गळण्याची समस्या आहे आणि त्यामुळेच त्याला टक्कल आहे. या समस्येमुळेच त्याला विगची गरज आहे. विग त्याच्या स्काल्पवर चिकटवावा लागतो, त्यामुळे त्याला दर दोन आठवड्यांनी ग्लू लावून चिकटावा लागतो.  याच कारणामुळे त्याने कॉन्ट्रॅक्टमध्येच या सर्विसबद्दल आधीच सांगितलं असावं.  मन्नारा चोपडा, अरुण श्रीकांत आणइ सनी आर्यने विक्की जैन आणि अंकिताला स्पेशल ट्रीटमेंट मिळण्यावर आवाज उठवला. 


यानंतर विकीला मिळणाऱ्या स्पेशल ट्रिटमेंटबद्दल मन्नारा चोप्रा कॅमेरासमोर जाऊन बोलली. यावर बिग बॉसने आपला निर्णय देत सांगितलं की, अंकिता आणि विकीने यावेळी घरातल्यांसोबत बोलावं आणि त्यांना याबद्दल समजवावं. जर घरातले सदस्य यावर मानले गेले नाहीत तर त्यांना मिळणारी ही स्पेशल ट्रिटमेंट बंद होऊ शकते.


याशिवाय अंकिताने मुनव्वरसोबत बोलताना तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंगबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. यावेळी बोलतान ती म्हणाली की, जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा तिचं बोलणं कोणीच ऐकून नाही घेतलं. आणि तिच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. याशिवाय ती सुशांतच्या अंत्यसंकाराला का गेली नाही हे देखील सांगितलं होतं. हे सगळं बोलताना ती मात्र खूप भावूक झाली होती.