`खर्च उचलावा लागतो म्हणजे काय...`, अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली `ती रस्त्यावर...`
काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. `विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो`, असे त्या म्हणाल्या. त्यावर आता अंकिताची मैत्रीण अभिनेत्री रश्मी देसाईने एक पोस्ट शेअर केली आहे.
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. सध्या बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व सुरु आहे. या पर्वात सहभागी झालेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. "विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो", असे त्या म्हणाल्या. त्यावर आता अंकिताची मैत्रीण अभिनेत्री रश्मी देसाईने एक पोस्ट शेअर केली आहे.
'बिग बॉस'च्या 17 व्या पर्वात फॅमिली वीकचा भाग पार पडला. यावेळी अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन या सहभागी झाल्या होत्या. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी "विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता, अंकिताचा खर्च उचलावा लागतो, विकीने लग्न केलंय, तर त्याच्या नात्यातील अडचणी त्याने सोडवाव्यात, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं-देणं नाही", अशी अनेक विधानं केली होती. आता त्यावर रश्मी देसाईने पाठिंबा देत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.
रश्मी देसाईचा संताप
यावेळी ती म्हणाली, "काकू मला माफ करा. पण अंकिताला या कार्यक्रमात कधीच सहभागी व्हायचे नव्हते. तिने हा कार्यक्रम तिच्या प्रेमासाठी म्हणजेच विकीसाठी केला. आणि खर्च उचलावा लागतो याचा अर्थ काय? त्या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्यापूर्वीही ती रस्त्यावर राहत नव्हती. ती अंकिता लोखंडे आहे. बिग बॉस तुमच्या मुलावर पैसा लावत असेल, पण आमची मुलगीदेखील खरं सोनं आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचणी असतात, पण हे लग्न टिकावं असं तुम्हाला वाटत नाही का?
प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडणं होतात आणि हा अवघड शो आहे. तुमचे दोन दिवसात हे हाल झाले. जर तुम्ही तिथे चार महिने राहिलात, तर तुम्हाला त्रास समजेल. मी तुमचा आदर करते. नेहमी करेन, पण इथे तुम्ही चुकताय", अशी पोस्ट रश्मी देसाईने केली आहे.
विकीची आई नेमकं काय म्हणाली?
दरम्यान, विकीची आई रंजना जैन यांनी काही दिवसांपूर्वी ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ''अंकिताशी लग्न करणं हा विकीचा निर्णय होता. आमचा त्यांच्या लग्नाला पाठिंबा नव्हता. लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी त्याचा होता, हे लग्न त्याला टिकवायचं आहे त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल आम्हाला काहीही देणंघेणं नाही. टीव्हीवर आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो तरीही दोघांना काहीच बोलत नाही. ‘बिग बॉस’ संपल्यावर त्या दोघांचं नातं सुधारण्यासाठी विकी जरुर प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे, असे म्हटले होते.