विरुष्काची नक्कल करणाऱ्या या जोडीची सोशल मीडियावर खिल्ली!
बिग बॉसच्या मागच्या सीजनमध्ये आपल्या भांडणांनी, मस्तीभरा अंदाजाने आणि मैत्रीमुळे लोकप्रिय ठरलेली जोडी पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा.
मुंबई : बिग बॉसच्या मागच्या सीजनमध्ये आपल्या भांडणांनी, मस्तीभरा अंदाजाने आणि मैत्रीमुळे लोकप्रिय ठरलेली जोडी पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा. शो मध्ये त्यांच्यातील वाढती जवळीक पाहण्यात येत होती. मात्र शो संपल्यानंतरही यांच्यातील जवळीक कायम असल्याचे दिसून येत आहे. या जोडीचा एक लव्ह सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सेल्फीमुळे दोघांनाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
असे काय आहे या फोटोत...?
तर यात बंदगी पुनीशतला कीस करताना दिसत आहे. पण त्यात काय खास किंवा वेगळे असे तुम्हाला वाटेल. पण त्याचे झाले असे की काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर पती विराट कोहली सोबतचा एक लव्ह सेल्फी शेअर केला होता. यात अनुष्का विराटच्या गालावर किस करत आहे. तसाच त्याच अंदाजातील सेल्फी पुनीश आणि बंदगीने शेअर केला आहे. यावरून त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. पहा विराट-अनुष्काचा म्हणजे विरुष्काचा सेल्फी आणि मग पुनीश आणि बंदगीचा म्हणजे पुंगीचा सेल्फी.
लोकांनी असे केले ट्रोल
हा सेल्फी अनेकांच्या पसंतीस पडला आहे. तर काही लोकांनी विरुष्काची कॉपी केल्यामुळे त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. यावर लोकांनी विचारले की विराटप्रमाणे तू ही गर्लफ्रेंडला बंदगीला कोट्यावधींचा फ्लॅट घेऊन देणार आहेस का?
बीग बॉसच्या टॉप ४ मध्ये
पुनीश शर्मा आणि बंदगी कालर, बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये झळकले होते. पुनीश शर्मा या शो च्या टॉप ४ पर्यंत पोहचला होता.