मुंबई : 'बिग बॉस 16' या रिएलिटी शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.  सुंबुल तौकीर, निमृत कौर अहलूवालिया आणि गौतम विगयांसरखे मोठे सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. शोच्या मध्यभागी   एक असामान्य दृश्य दिसलं ज्यावर बरेच दिवस चर्चा सुरु होती. ज्याला स्वत:ने ओळख करुन दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा स्पर्धक दुसरा कोणी नसून ताजिकिस्तानचा गायक अब्दु रोजिक आहे. अब्दु रोजिकची उंची खूपच लहान आहे आणि तो बिग बॉसच्या आधी अनेक शोमध्ये दिसला आहे. आयफामध्येही तो सलमान खानसोबत दिसला होता.


अब्दु या आजाराने ग्रस्त आहे
अब्‍दु रोजिक हा ताजिकिस्तानी गायक आहे. गायक आपल्या रॅपिंग स्टाईलने सोशल मीडिया सेन्सेशन बनला होता. अब्दुचे स्वतःचं YouTube चॅनेल आहे. ज्याचे हजारो चाहते आहेत. अब्दु रोजिक यांचा जन्म 3 सप्टेंबर 2003 रोजी ताजिकिस्तानमध्ये झाला. अब्दूला लहानपणी रिकेट्स नावाचा आजार झाला होता, त्यामुळे त्याची उंची वाढू शकली नाही. अब्दू रोजिकचं 'ओही दिली जोर हे' रॅप गाणे प्रसिद्ध आहे. या गाण्याने त्याने गायनाच्या जगात ओळख मिळवली. अब्दूची गणना जगातील सर्वात लहान गायकांमध्ये केली जाते.


अब्दु रोजिक त्याच्या लहान उंचीमुळे आणि गोंडस लूकमुळे इंटरनेटवर वर्चस्व गाजवतो. इंस्टाग्रामवर सिंगरचे ३.८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अब्दू रोजिकचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत. विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि शाहिद कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड सिट्रोन्ससोबत गायकाला अनेकदा पाहिलं गेलं आहे. अब्दु रोजिक लवकरच अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून गायक बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.