मुंबई : बऱ्याच दिवसांपासून उर्फी जावेद हे नाव अनेकदा सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून गेलं. निमित्त होतं, ते म्हणजे तिचा फॅशन सेन्स. उर्फीनं कायमच चौकटीबाहेर जात नवनवीन प्रकारच्या कपड्यांना प्राधान्य दिलं आहे. प्रत्येक वेळी तिला इतरांच्या रोषाचाच सामना करावा लागला आहे. पण, आता मात्र उर्फीनं आपली खिल्ली उडवली जाण्यावर व्यक्त होण्य़ास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटींची मुलं आणि टेलिव्हिजन कलाकारांना ज्या पद्धतीनं वेगळी आणि विवित्र वागणूक दिली जाते, हे पाहून उर्फीनं सर्वांचीच कानउघडणी केली आहे. 


बिकीनी घातल्यानंतर अनेकांनीच तिला 'चीप' म्हटलं, हे पाहत उर्फीनं एक आर्टिकल शेअर केलं. ज्यामध्ये तिचा उल्लेख 'आयलंड गर्ल' असा करण्यात आला होता. यावर उर्फीनं लिहिलं, 'बघा, स्टारकीड्ससाठीची हेडलाईन....'. उर्फीनं सोबतच आपल्यासाठी लिहिण्यात आलेल्या हेडलाईनबाबतही प्रतिक्रिया दिली. आपण स्टार किड्सपैकीच एक नसतो तेव्हा नेमकं काय होतं, यावर तिनं प्रकाश टाकला. 




मी बिकीनी घातली की ते चीप, विचित्र आणि स्टारकिड्सनं असं काही केलं तर ते म्हणे 'हॉट', असं म्हणत तिनं एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला. बोल्ड फोटो सातत्यानं शेअर करणाऱ्या उर्फीनं तिची खिल्ली उडवणाऱ्यांना यावेळी चांगलंच सुनवल्याचं पाहायला मिळालं.