मुंबई : सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत त्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद हिच्या नव्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तिनं एका दिग्दर्शकाचा खरा चेहरा समोर आला आहे. (Urfi Javed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबेद आफ्रिदी नावाच्या कास्टींग डिरेक्टरनं कशा प्रकारे आपली फसवणूक केली याचा खुलासा तिनं केला. 


अभिनेत्री होण्याचं स्वप्न दाखवत त्यानं कशा प्रकारे आपली आणि आपल्यासारख्या काही मुलींची व्हिडीओ साँगमध्ये काम देण्याच्या बदल्यात एक रात्र सोबत राहण्याची मागणी केली, याचा उलगडा केला. 


उर्फीनं आपला कशा प्रकारे लैंगिक छळ केला गेला, याचा गौप्यस्फोट करताच तिच्यासारख्या आणखीही काही मॉडेल्सनी या मुद्द्यावर स्पष्टपणे व्यक्त होण्यास सुरुवात केली. 


व्हिडीओमध्ये काम देतो सांगून त्याऐवजी न्यूड व्हिडीओ कॉल करण्याची मागणी, लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी कशा प्रकारे केली जात होती यावरून त्यांनी पडदा उचलला. 


दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेले हे गंभीर आरोप खोटे असल्याचं म्हणत सर्व दावे त्या कास्टिंग डिरेक्टरनं धुडकावून लावले. 


काम पूर्ण होतं, तेव्हा लोक असेच बदनामी करतात असा टोला त्यानं दिला. ज्यावर उत्तर देत तू माझ्यासोबत नीट काम केलं असतंस तर आरोप करण्याची गरजच नव्हती, असं ती म्हणाली. 



हे सर्व पैशांसाठी केलं जात नाही, माझ्याकडे पुरावे आहेत जिथं त्यानं मुलींसमोर Masturbute केलं, बरं हे सगळं करून ही व्हिडीओ मीटींग असल्याचंही तिनं सांगितलं. 


या व्यक्तीशी मी लढा देत आहे, कारण तो विक्षिप्त वृत्तीचा माणूस आहे, असं म्हणत मुली त्याच्या आजुबाजूला सुरक्षित नाहीत असा इशाराच तिनं दिला.