किती शिकलीये, किती कमवते, कशी जगते? उर्फी जावेदबाबत तुम्हाहा ‘हे’ ठाऊकच नसेल
मन नसतानाही तिनं हे केलं....
मुंबई : गेल्या काही काळापासून ऑनलाईन जगतामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे उर्फी जावेद. विचित्र फॅशन सेन्स, त्यातही तो मिरवण्याचा आत्मविश्वास या साऱ्यामुळं उर्फीची खिल्ली उडवण्याच्या कारणानं का असेना, चर्चा दणक्यात सुरु असते. आपल्याविषयी सुरु असणाऱ्या या चर्चा उर्फीपर्यंत पोहोचूनही ती या साऱ्याकडे लक्ष न देता आपल्यास अंदाजा आयुष्य जगताना दिसते. (Urfi Javed)
तिचा हा अंदाज नकळतच कित्येकांना भावतो. ही उर्फी आहे तरी कोण, ती आधी काय करत होती, ती सध्या काय करते असे असंख्य प्रश्न सर्वांना पडताना दिसतात. या सर्वांमध्ये नेटकऱ्यांची संख्या तुलनेनं जास्त.
याच सर्व प्रश्नांची उत्तरं तिनं हल्लीच एका मुलाखतीत दिली. शालेय जीवनानंतर आपण फक्त जवळपास 6 महिनेच महाविद्यालयात गेल्याचं ती म्हणाली. त्यातही कॉलेजला दांडी मारत ती ऑडिशन्ससाठी जात असे.
परिणामी महाविद्यालयीन दिवसांमध्ये तिला हे आयुष्य जगण्यची फार संधी मिळाली नाही. पैशांची चणचण उर्फीची पाठ सोडत नव्हती. त्यामुळं तिला एक शो करावा लागला. ज्यासाठी तिला 2500 रुपये मिळाले होते. हीच तिची पहिली कमाई.
लीड रोलसाठी ऑडिशन द्यायला गेलेल्या उर्फीला तिथं एकाच दिवसाचा रोल दिला गेला. सीनमध्ये एक मुलगा असेल, तुला फक्त त्याच्या अंगावर जायचंय असं निर्माते म्हणाले... ऐकायला हे वाईटच वाटेल पण, तेव्हा आपल्याला पैशांची गरज असल्यमुळं तेही केलं असं उर्फीनं सांगितलं.
पैशांसाठी अशा भूमिका केल्याबद्दन तिला याचा कायम पश्चाताप वाटतो. राहिला मुद्दा उर्फिच्या कपड्यांचा आणि फॅशन डिझायनरचा, तर महागडे कपडे अवाक्याबाहेरचे असल्यामुळं सध्या ती स्वत:च स्वत:चे कपडे तयार करते.