उर्फी जावेदचा `तो` VIDEO आला समोर,पाहून तुम्हालाही बसेल धक्का
रस्त्यावर विचित्र कपडे घालून फिरणाऱ्या Urfi Javed चा घरातला `हा` धक्कादायक VIDEO
मुंबई : आपल्या हटके स्टाईल आणि लुकने नेहमीच चर्चेत असणारी बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत नेहमीच ती चाहत्यांशी संवाद साधत असते.आता तिचा आणखीण एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओची खुप चर्चा रंगतेय.
उर्फी जावेदला (Urfi Javed) कोणत्याही परिचयाची गरज नाही. आता ती फॅशन आयकॉन बनली आहे. जिथे ती नेहमीच तिच्या लूकसाठी चर्चेत असते. सोशल मीडियवरील व्हिडिओ आणि फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
व्हिडिओत काय?
उर्फी जावेदला (Urfi Javed) चार बहिणी आहेत, ज्यांची नावे आसफी, उरुसा आणि डॉली आहेत. उर्फीची बहीण उरुसा हिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद तिच्या चार बहिणींसोबत तिच्या घरात खूप मस्ती करताना दिसत आहे.कुटूंबासोबत उर्फी वेळ घालवताना दिसत आहे. कधी घरची साफसफाई करतेय, तर कधी भावंडांसोबत तुफान मस्ती करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत उरुसाने कॅप्शनमध्ये लिहिले,“माझ्याकडे असलेले आणखी व्हिडिओ अपलोड करावेत अशी माझी इच्छा आहे. मला असे क्षण पुन्हा अनुभवता यावेत अशी माझी इच्छा आहे. उर्फीच्या बहिणीने शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
उर्फी जावेद ग्लॅमर जगतातील सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार बनली आहे. सोशल मीडियावर तिला व्हायरल गर्ल असेही संबोधले जाते.