मुंबई : अतरंगी आणि विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या फर्फी जावेदची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर उर्फी सतत सक्रिय असते. बरं सक्रिय असण्यासोबतच हल्ली ती काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या भूमिकाही मांडू लागली आहे. (Urdi Javed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच इस्लाम धर्मातील काही रुढी परंपरांबाबत वक्तव्य करणाऱ्या याच उर्फीनं यावेळी पुन्हा एकदा चौकटीबाहेरच्या एका आऊटफिटला पसंती दिली आहे. 


बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) मुळं प्रसिद्धीझोतात आलेल्या उर्फीनं नुकताच शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वांचीच नजर तिच्यावर खिळली. 


एका काळ्या रंगाच्या बँकलेस गाऊनमध्ये ती दिसत आहे. चोकर नेकलाईन असणाऱ्या या ड्रेसच्या फुलस्लीव्ह्ज याला स्पेशट टच देत आहेत. 


साजेशी हेअरस्टाईल आणि ज्वेलरीची जोड तिनं या लूकला दिली आहे. 


उर्फीचा हा लूक तिच्या चाहत्यांना भावला असला तरीही काही नेटकऱ्यांना मात्र तिची ही अदा खटकली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Urrfii (@urf7i)


सोशल मीडियावर कमेंट करत अरे हिला थंडी- वारा लागतो की नाही असा उपरोधिक प्रश्न काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर, हिच्या फॅशन डिझायनरला शोधा पहिलं, अशीही कमेंट काहींनी केली आहे. 


सोशल मीडिया ट्रोलिंगलाही धुडकावून लावत उर्फी मात्र तिच्याच दुनियेत रमलीये असं म्हणायला हरकत नाही.