खुलं बटण, अंडरगार्मेंट्सनंतर आता Urfi Javed ची पसंती आणखी एका अतरंगी ड्रेसला
बस्स, मग काय साऱ्या नजरा तिच्यावरच खिळल्या.
मुंबई : 'बिग बॉस' या कार्यक्रमातून झळकलेली असली, तरीही या कार्यक्रमामुळं कमी पण, जगावेगळ्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद यावेळी पुन्हा एकदा एका ड्रेसमुळंच चर्चेत आली आहे. Urfi Javed तिच्या नव्या लूकमध्ये समोर आली आणि बस्स, मग काय साऱ्या नजरा तिच्यावरच खिळल्या.
सोशल मीडियावर सध्या उर्फाचा हा लूक प्रचंड व्हायरल होत आहे. मेकअप केल्यामुळं अर्थातच त्यामुळं Urfi Javedचा चेहरा वेगळाच दिसत आहे. शिवाय तिनं घातलेला ड्रेसही चर्चांना वाव देत आहे. हलक्या सोनेरी रंगाचा हा चमचमणारा एक शॉर्ट ड्रेस असून, त्याला एक हिजाबही जोडलेला दिसत आहे.
उर्फी या ड्रेसमध्ये समोरून आली, तेव्हा तिचा हिजामधील लूक दिसला. पण, ज्यावेळी ती पाठीमागे वळली तेव्हा मात्र तिच्या या आऊटफिटच्या बॅकलेस टचनं साऱ्यांच्या नजरा वळवल्या.
फॅशनचा हा ट्रेंडही उर्फीनं चांगलाच कॅरी केल्याचं पाहायला मिळत आहे. पण, काहींना मात्र तिचा हा अंदाज रुचलेला नाही. ज्यामुळं तिला ट्रोलिंगचाही शिकार व्हावं लागलं आहे. उर्फी सतत काही ना काही हटके लूक करत असते. तिचा हा बॅकलेस ड्रेसही याच यादीतील एक लूक ठरत आहे.