मुंबई : बिग बॉसचं घर असं घर आहे जिथे अनेकांची मनं जुळतात. आणि अनेकांची हृदयं तुटतात. घरातून बाहेर पडल्यावर अनेक कपल तयार होतात आणि अनेक कपल तुटतात, पण एक जोडपं असं आहे की, ज्यांचं प्रेम काळासोबत आणखीनच वाढत जातंय आणि ही जोडी म्हणजे एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांची आहे. कॅमेऱ्यासमोरही त्यांचा रोमान्स कमी होण्याचं नाव घेत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅमेऱ्यासमोर रोमँटिक
'बिग बॉस'मध्ये दरवर्षी एक अशी जोडपी असते जी घरात एकमेकांच्या जवळ येतेच आणि त्यांच्या प्रेमाची बाहेरही चर्चा होते. बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्येही असंच काहीसं घडलं होतं. सुरुवातीला एकमेकांना न आवडणारे पवित्रा पुनिया आणि एजाज खान नंतर एकमेकांच्या जवळ आले आणि इतके जवळ आले की, आता ते कॅमेऱ्यासमोर रोमान्स करण्यासदेखील मागेपुढे पाहत नाहीत.


एजाज खूपच रोमँटिक झाला 
एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एजाज आणि पवित्रा व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहेत. व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होतं की, दोघंही खूप रोमँटिक मूडमध्ये आहेत. त्यामुळे एजाजने कॅमेऱ्यासमोर पवित्राला आपल्या मांडीवर उचललं आणि जाहीरपणे किस करायला सुरुवात केली. एजाज खानला पवित्राचा मास्क काढूनही किस करायचं होते, मात्र पवित्राने नकार दिला. दोघांचंही एकमेकांवर इतकं प्रेम आहे की, त्यांना जगाचीही पर्वा नाही, हे हा व्हिडिओ पाहून स्पष्ट होतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकांनी ट्रोल केलं
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांना खूप ट्रोल केलं जात आहे. अनेक यूजर्स त्यांना हे सगळं कॅमेऱ्यासमोर न करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, एजाज खान मीडियासमोर रोमँटिक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा एजाज कॅमेऱ्यासमोर पवित्राला किस करतो.