बिग बॉस शो मराठीत येणार म्हटल्यावर होस्ट कोण करणार ही चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मराठी सिनेसृष्टीत ज्यांचा दबदबा आहे असे निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर हा मराठी बिग बॉस होस्ट करताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे. 


बिग बॉस हा शो सगळ्यांचा फेव्हरेट आहे. त्यात हिंदीतील बिग बॉस होस्ट सलमान खान सगळ्यांचा चाहता होता. आता महेश मांजरेकरांना देखील तेवढीच किंवा त्याहून अधिक लोकप्रियता मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या अगोदर बिग बॉस रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्याजागी महेश मांजेरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 



बिग बॉसला मिळणारी पंसती खूप आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांना बिग बॉस पाहणं आवडतं. असं सगळं असताना आता हे बिग बॉस मराठीत येत आहे. महेश मांजरेकरांचा लूक कायमच हटके राहिलेला आहे. या शो करता तोच रांगडा लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.