Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी' कन्नड आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सोनू श्रीनिवास गौडाला पोलिसांनी अटक केली आहे. सोनू श्रीनिवासला अटक करण्याचं कारण मुलीला दत्तक घेणं आहे. शुक्रवारी पोलिसांनी तिला अटक केलं. सोनू श्रीनिवास गौडावर हा आरोप आहे की जेव्हा तिनं मुलीला दत्तक घेतलं तेव्हा तिनं योग्य त्या प्रक्रियेचं पालन केलं नाही. बाल कल्याण समितीनं तिच्यावर तक्रार केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू श्रीनिवास गौडानं नुकतंच एका मुलीला दत्तक घेतलं आहे. ज्यासाठी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर तिच्या अटकेनंतर हे सगळं प्रकरण समोर आलं आहे. सोनू श्रीनिवास गौडावर बाल कल्याण समितीनं गंभीर आरोप केले आहेत. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, तक्रार करण्यात आलेल्या सोनू श्रीनिवास गौडानं सगळ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी मुलीला दत्तक घेतलं. ज्यामुळे तिला एक सेलिब्रिटी असल्याचा दर्जा मिळेल. सोनू विरोधात ही तक्रार बयादरहल्ली पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर तिला अटक करण्यात आलं.



संपूर्ण प्रकरणात सोनू श्रीनिवास गौडानं स्वत: ला निरअपराधी म्हटवं. तिनं दावा केला की तिनं दत्तक घेण्याच्या सगळ्या प्रक्रियांचे पालन केले. त्यासोबत तिनं तिच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करत सांगितलं की मुलीला घरी घेऊन यायला तिला फक्त 15 दिवस लागले आहेत. सध्या बाल कल्याण समितीचे अधिकारी तिच्याशी विचारपूस करत आहेत. 


सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा


सोनू श्रीनिवास गौडानं तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं मुलीला दत्तक घेतल्याच्या बातमीचा खुलासा केला. या व्हिडीओत मुलीच्या आई-वडिलांसोबत एक रेकॉर्डेड फोन कॉल देखील होता. खरंतर, बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सोनू श्रीनिवास गौडा जवळ दत्तक घेण्याच्या प्रक्रिये संबंधीत कोणतीही माहिती मिळाली नाही. 


3 महिन्या आधी सोनूनं दिली होती माहिती


दरम्यान, या आधी सोनू श्रीनिवास गौडानं जेव्हा मुलीला दत्तक घेतल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. तेव्हा तिला सोशल मीडियावर फार ट्रोल करण्यात आलं होतं.