रणबीर- आलियापूर्वी `ही` जोडी अडकणार लग्नाच्या बेडीत
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाची धामधूम सुरु आहे.
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाची धामधूम सुरु आहे. नुकतीच आलियाच्या भावाने खुलासा केला आहे की, आलिया-रणबीर 20 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. तर दुसरीकडे सिनेसृष्टीतलं अजून एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बिग बॉस ओटीटी फेम आणि पंजाबी गायक मिलिंद गाबा त्याची गर्लफ्रेंड प्रिया बेनिवालसोबत लग्न करणार आहे.
16 एप्रिलला प्रिया आणि मिलिंद सात फेरे घेणार आहेत. दोघांच्या लग्नाचे फंक्शन सुरू झाले असून संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिलिंद आणि प्रियाने सोमवारी संगीत आणि कॉकटेल पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकं सहभागी झाले आहेत. मिलिंद आणि प्रियाच्या संगीत आणि कॉकटेल पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मिलिंद आणि प्रियाच्या फंक्शनमध्ये भूषण कुमार, मिका सिंग, गुरु रंधावा, सपना चौधरी, सुयश राय, प्रिन्स नरुला यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मिलिंद आणि प्रियाच्या फंक्शनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दोघं एकत्र एंट्री करताना दिसत आहेत. तर दुसऱ्यामध्ये प्रिया स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.
मिलिंदाच्या बहिणीचा स्पेशल परफॉर्मन्स
मिलिंदची बहीण पल्लवी गाबा हिने एका मुलखतीत संगीताविषयी खास बातचीत केली. ती म्हणाली, मी माझ्या भाऊ आणि वहिनीसाठी खास डान्स परफॉर्मन्स देणार आहोत. या परफॉर्मेन्समध्ये मी एकटीच नाही तर आमचे सगळे चुलत भाऊही असणार आहे. जेव्हा आम्ही डान्स रिअर्सल करत होतो तेव्हा मला जाणवलं की, आमचे वडील देखील डान्स करू शकतात.
मिलिंद आणि प्रिया गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2018 मध्ये दोघांची भेट झाली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि मिलिंद 2020 मध्ये रोका सेरेमेनी केली. 2 वर्षांच्या रोका सोहळ्यानंतर आता दोघेही लग्न करणार आहेत.