घटस्फोट घेऊन, त्यानंतरच....; रितेशचे पत्नीवर गंभीर आरोप
काही व्यक्ती सातत्यानं चर्चेत असतात. त्यांच्या चर्चेत असणाऱ्याला साधंसुधं कारणंही पुरेसं असतं. अशाच प्रसिद्धीझोतात आणि सातत्यानं चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये एका अशा व्यक्तीचं नाव आहे, जिच्याभोवती सतत कसलं ना कसलं वलय असतं.
मुंबई : काही व्यक्ती सातत्यानं चर्चेत असतात. त्यांच्या चर्चेत असणाऱ्याला साधंसुधं कारणंही पुरेसं असतं. अशाच प्रसिद्धीझोतात आणि सातत्यानं चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये एका अशा व्यक्तीचं नाव आहे, जिच्याभोवती सतत कसलं ना कसलं वलय असतं.
ही व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. राखी सावंत ही सध्या बिग ब़ॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोमुळं प्रकाशझोतात आली आहे.
सध्या या शोमधून तिचा कथित पती, रिकेश यानं एक्झिट घेतली आहे. जिथं त्याला याचा हादरा बसला आहे, तिथे त्यानं राखीसोबतच्या लग्नाचा खुलासाही केला आहे.
पत्नी स्निग्धा प्रिया हिच्याशी अद्यापही घटस्फोट झाला नसल्यामुळं रितेश आणि राखी यांचा लग्नाचा दावा खोटा ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे.
याचंच उत्तर देत रितेशनं स्पष्ट केलं आहे ही स्निग्धासोबत त्याचा घटस्फोट झालेला नाही. तिनं आपलं आयुष्य पूर्णपणे बिथरवलं आहे असं त्यानं सांगितलं.
राखीबाबत सांगावं तर, आमचं काही लग्न झालेलं नाही. कोर्ट मॅरेजही झालेलं नाही. पण, आम्ही देवाच्या साक्षीनं या नात्याला पुढे आणलं आहे.
राखीसोबतच्या नात्यात सध्या काय स्थिती आहे, असं विचारलं असता रितेशनं काही मुद्दे स्पष्ट केले.
'राखीसोबतचं माझं नातं हे मनापासूनचं आहे. ती मला पती मानते आणि मी तिला पत्नी. घटस्फोट झाल्य़ानंतर मी राखीशी लग्न करेन.
राखीनं मला आयुष्याच्या त्या वळणावर आधार दिला, जेव्हा मी वैयक्तिक जीवनात बऱ्याच अडचणींना तोंड देत होतो.
तेव्हा परिस्थिती अशी होती की मी एकतर वेडा झालो असतो किंवा मद्यधुंद झालो असतो', असं तो म्हणाला.
जुलै महिन्यात ज्यावेळी एका हॉटेलमध्ये राखीला आपण भेटलो तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो, असं रितेशनं सांगितलं.
आपल्या पहिल्या पत्नीकडून बऱ्याच प्रसंगी अडचणी उभ्या करण्यात आल्याचा खुलासा रितेशनं माध्यमांशी संवाद साधताना केला. शिवाय त्यानं राखीसोबतचं नातं अधिकत स्पष्टपणे सर्वांपुढे ठेवलं.
आता महत्त्वाचा मुद्दा हा, की रितेश हा कार्यक्रम संपल्यानंतर राखीसोबतच्या त्याच्या नात्याला खरंच एक नवं नाव देणार का?