Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) लवकरच आई-बाबा होणार आहे. बिपाशाने गेल्या महिन्यात सोशल मीडियावर बेबी बंप (baby bump) फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले. चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यासोबतच काही नेटकऱ्यांनी या फोटोवरुन तिला ट्रोलही केलं होतं. भारतीय संस्कृतीनुसार अशाप्रकारचे फोटो टाकणे योग्य नाही अशा शब्दात नेटकऱ्यांनी बिपाशाला सुनावलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज परत बिपाशा बसूने (Bipasha Basu))  तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर साडीमधील सुंदर फोटो शेअर केलं आहे. बंगाली विधीनुसार 'शाध समारंभ'चे हे फोटो आणि व्हिडीओ आहेत. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या लोकांसोबत हा विधी पाचव्या किंवा सातव्या महिन्यात केला जातो. या व्हिडीओमध्ये बिपाशाची आई लेकीवर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देताना दिसतं आहे. (bipasha basu baby shower ceremony video and photo on social media)



बिपाशाच्या आईने खास तिच्या आवडीचे पदार्थ केलेलं दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता खास बंगाली थाली बिपाशासाठी बनविण्यात आली आहे. या समारंभाचे फोटो शेअर करताना बिपाशाने आईला धन्यवाद म्हटलं आहे. 



बिपाशाने या समारंभासाठी खास गुलाबी रेशमी साडी नेसली आहे आणि त्यासोबत सोनेरी दागिने घातले आहे. या साडीमध्ये बिपाशाचं रुप एकदम खुलून दिसतं आहे. तर पती करण सिंग ग्रोवरने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजामा घातला आहे. या फोटोमध्ये हे कपल एकदम क्यूट दिसतं आहे. हे फोटो शेअर करताना बिपाशा म्हणते की,"माय डिअर बेबी!".  नवीन पाहुण्याचा आगमनासाठी बिपाशा खूप उत्सुक असल्याचं या फोटोमधून दिसून येतं आहे.