Karan Singh Grover Bipasha Basu Daughter Devi : अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी 30 एप्रिल 2016 लग्न केलं. त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी त्याचा घरी पाळणा हलला. बिपाशा आणि करणने बेबी बंपसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली.  12 नोव्हेंबर 2022 ला बिपाशा आणि करण यांना मुलगी झाली. या दोघांनी बाळाचं नाव देवी असं ठेवलं. प्रेग्नेंसचे दिवस जेवढे आनंदाचे असतात. एका पाहुण्याची चाहुल आपल्याला लागलेली असते. इवले इवले पाऊल आपल्या घरात फिरणार असतात. बाळाच्या रडण्याचा तो आवाज प्रत्येकाला मधुर वाटतं असतो. पण हे प्रेग्नेंसचे दिवस एका आईसाठी खूप कठीणदेखील असतात. बिपाशालादेखील अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं. 


'प्रेग्नेंसीमध्ये मी बेडवर किंवा बाथरुममध्ये...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत बिपाशाने तिच्या गरोदरपणातील समस्यांबद्दल सांगितलं. बिपाशाला सुरुवातीच्या दिवसामध्ये खूप आळशीपणा जाणवायचा आणि दिवसभर मॉर्निंग सिकनेसचा त्रास व्हायचा. बिपाशा म्हणाली की, तिचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. तिला दिवसभर विचित्र वाटायचं आणि तिचा संपूर्ण वेळ बेडवर लोळण्यात किंवा बाथरुममध्ये जायचा. (Bipasha Basu Pregnancy Complications delivery c section or normal devi face first photo marathi health news)


प्रेग्नेंसीमध्ये बिपाशाने केल्या 'या' गोष्टी


बिपाशाला गरोदपमाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये अजिबात भूक लागायची नाही. त्यामुळे तिचं वजनही कमी झालं होतं. प्रेग्नेंसीमध्ये महिलांना वेगवेगळ्या गोष्टींची क्रेविंग्स होतं. पण बिपाशाला कुठलीही गोष्टीची क्रेविं झाली नाही. काही दिवसांनी बिपाशाने पुन्हा जिम सुरु केलं. त्यासोबत पौष्टिक अन्न खाण्यावर भर दिला. याचा फायदा बाळाच्या आरोग्यावर झाला. जिम सोबत बिपाशा योगा आणि मेडिटेशन करायची. याचा तिच्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदा झाला. 



बिपाशाची प्रसूती नॉर्मल की सी - सेक्शन?


बिपाशा बासूच्या मुलीचा जन्म हा नॉर्मल की सी - सेक्शन कसा झाला हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण बिपाशा बासूची डिलीव्हरी ही नॉर्मल झाली की सी सेक्शन याबद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.