Lata Mangeshkar Birth Anniversary : गानसरस्वती, गानकोकिळा, भारतरत्न अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची नव्यानं ओळख करुन देण्याची काहीच गरज नाही. फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळवलेला हा एक आविष्कार. दीदी आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र चाहत्यांनी पुन्हा एकदा त्यांची आठवण काढत या गायिकेच्या नसण्याची खंत व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 सप्टेंबर 1929 ला मध्य प्रदेशातील इंदौर (Lata Mangeshkar Birth Place) येथे जन्मलेल्या लतादीदींचा आयुष्यपट विविध प्रसंगी आपल्या समोर आला. दीदींचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी सारंकाही चाहत्यांना ठाऊक झालं. पण, एक अशीही गोष्ट आहे जी फारशी चर्चेत आली नाही. ही गोष्ट दीदींच्या खासगी आयुष्याशी निगडीत आहे. 


दीदी आजन्म अविवाहित राहिल्या. त्यांनी लग्न का केलं नाही असे प्रश्नही अनेकांच्या मनात घर करुन गेले. पण, या प्रश्नांच्याही पलीकडे जाऊन एक असं वास्तव आहे हे क्वचितच कोणाला ठाऊक असावं. 


कोणाच्या प्रेमात होत्या Lata Mangeshkar? 
दीदी ज्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या ती व्यक्ती कुणी सेलिब्रिटी किंवा गायक नसून, ते एक महाराज होते. हृदयनाथ मंगेशकर यांचे ते चांगले मित्र होते. ते होते डूंगरपुर राजघराण्यातील महाराजा राज सिंह (Maharaja Raj Singh). दीदी आणि महाराज यांची ओळख त्या वेळची जेव्हा ते (महाराज) वकिलीच्या शिक्षणासाठी मुंबईत आले होते. ही तिच वेळ होती जेव्हा दीदीसुद्धा महाराजांची भेट घेण्यासाठी भावासोबत त्यांच्या घरी जात होत्या. 


अधिक वाचा : lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग


दीदींनी त्या महाराजांशी लग्न केलं असतं, तर आज त्यांनाही राणीपद मिळालं असतं. पण, सामान्य मुलीशी लग्न करायचं नाही असं महाराजांना कुटुंबाकडून सांगण्यात आलं होतं. शेवटी त्यांनी कुटुंबाला दिलेला शब्द पाळला. हा तोच क्षण होता जेव्हा तत्त्वांसाठी, कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी प्रेमाच्या नात्याचा बळी गेला होता. 


मुख्य म्हणजे महाराज आणि दीदींचं नातं इतकं घट्ट होतं की त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. दीदींनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कारकिर्द आणि कुटुंबीयांची काळजी घेण्यात वाहिलं.