Rishi Kapoor Birth Anniversary,स्वतःच्याच लग्नात ऋषी कपूर-नीतू बेशुद्ध, मिळालेलं गिफ्ट पाहून दोघांची अवस्था..
ऋषी कपूर यांना त्यांच्या पत्नीची अभिनेत्री नीतू (Neetu Singh) आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ मिळाली पण....
मुंबई : दिवंगत अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांचा आज वाढदिवस. त्यांना जाऊन जवळपास एक वर्ष झालय, आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से चर्चेत असतात. याच निमिताने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. सोशल मीडियावर ऋषि कपूर यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या जात आहेत. अशीच एक आठवण आहे त्यांच्या लग्नातली .
ऋषी कपूर यांना त्यांच्या पत्नीची अभिनेत्री नीतू (Neetu Singh) आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ मिळाली. पण ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 रेजी नीतू यांची साथ सोडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी कपूर आणि नीतू दोघेही त्यांच्या लग्नात बेशुद्ध पडले होते. हा किस्सा खुद्द नीतू यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. नीतू आणि ऋषी कपूर यांचा विवाह 1980 मध्ये झाला होता. हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या विवाह सोहळ्यात अनेकांना आमंत्रित करण्यात आले.
नीतू यांनी सांगितलं की, लग्नात अभिनेत्रीने घातलेला लेहेंगा अत्यंत जड होता. म्हणून लग्नात त्या बेशूद्ध झाल्या. तर दुसरीकडे लग्नातील गर्दी पाहून ऋषी गोंधळून गेले आणि ते देखील बेशूद्ध पडले. एवढंच नाही तर नीतू यांनी त्यांच्या आणि ऋषी यांच्या लग्नाशी संबंधित अनेक रंजक किस्सेही शेअर केले आहेत. असाच एक किस्सा होता लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंचा.
ऋषी आणि नीतू यांच्या लग्नात अनेक न बोलावलेले पाहुणेही आले होते. लोक सूटबूट घालून लग्नाला आले होते. हे पाहूणे नक्की कोण आहेत, याचा अंदाजही लावणे कठीण होते. मात्र, लग्नानंतर भेटवस्तू उघडताना अनेक गिफ्ट बॉक्समध्ये दगड होते, असं देखील नीतू म्हणाल्या.