...म्हणून रणवीरसोबत वाढदिवस साजरा करण्यास दीपिकाचा नकार
५ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोन सध्या तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'पद्मावत' चित्रपटानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यास सज्ज झाली आहे. तर हा चित्रपट तिच्या आयुष्याला वेगळं वळण देणारा चित्रपट ठरणार आहे. ५ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे. पण यंदाचा वाढदिवस ती अभिनेता आणि पती रणवीर सिंगसोबत साजरा करणार नाही.
तिच्या या निर्णयामागे कारण देखील फार खास आहे. २०२०चा वाढदिवस ती अॅसिड हल्ला पीडित तरुणींसोबत साजरा करणार आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दीपिका तिचा ३४ वा वाढदिवस लखनऊ येथील शिरोज कॅफेला उपस्थित राहणार आहे. अॅसीड पीडित महिला मिळून हा कॅफे चालवतात.
म्हणून ती तिचा हा वाढदिवस पती रणवीरसोबत साजरा करणार नाही. दीपिकाचा आगामी चित्रपट ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला चित्रपट आहे.
ऑसिड हल्ला होवूनही आयुष्य स्वछंदीपणे जगणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीच्या आयुष्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. १० जानेवरी २०२०ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे अभिनेता अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सुध्दा १० जानेवरी २०२० ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.