मुंबई : बॉलिवूड आणि टी.व्ही. अभिनेत्री रेणूका शहाणेचा आज 53 वा वाढदिवस आहे. रेणूकाचा जन्म 27 मार्च 1965 मध्ये मुंबईत झाला. तिने सेंट झेव्हीअर्स कॉलेजमधून सायकोलॉजीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर मुंबई विद्यापिठातून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...


करिअरची सुरुवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेणूका शहाणेने 1989 मध्ये दूरदर्शनवर आलेल्या सर्कस मालिकेतून तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 1933 मध्ये तिने सुरभी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याच कार्यक्रमाने तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने 2009 मध्ये रिटा सिनेमाचे दिग्दर्शन केले. 1994 मध्ये आलेल्या हम आपके है कौन या सुपरहिट सिनेमातील तिने रंगवलेली सलमानची भाभी लोकप्रिय ठरली. याचबरोबर रेणूकाने मनी मनी, मासूम, एक अलग मौसम, दिल ने जिसे अपना कहा, हायवे यांसारख्या अनेक हिंदी, तामिळ आणि मराठी सिनेमात काम केले.


हे रेणुकाचे दुसरे लग्न


रेणुकाने 25 मे 2001 मध्ये बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणासोबत दुसरे लग्न केले. रेणुकाचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही. आशुतोष राणा मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातील असल्यामुळे या लग्नामुळे रेणुकाची आई काहीशी चिंतीत होती. पण त्यांच्या सुखी संसाराने सगळे गैरसमज दूर केले. या दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत. रेणुका आशुतोषपेक्षा अडीच वर्ष मोठी आहे.


अलिकडेच रेणूकाचा 3 स्टोरीज हा सिनेमा प्रदर्शित झाला.