मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री तब्बू आज ४७  वा वाढदिवस साजरा करत आहे. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या तब्बूचे पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असे आहे. १९८० मध्ये तिने आपल्या करिअरची सुरूवात केली. तेलगु सिनेमा कुली नं.१ हा तिचा पहिला सिनेमा आल्यानंतर बॉलीवूड चित्रपटात ती दिसू लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बोनी कपूर यांचा प्रेम हा सिनेमा तिने साइन केला होता पण तो सिनेमा पूर्ण होण्यास ८ वर्षाचा वेळ लागल्याने 'पेहला पेहला प्यार' हा तिचा पहिला सिनेमा ठरला.


या सिनेमातूनही तिला ओळख मिळाली नाही. पण तिच्या फिल्मी करिअरला या सिनेमामूळे ब्रेक लागला नाही.  त्यानंतर तब्बू अजय देवगणबरोबर 'विजयपथ' सिनेमात दिसली. तब्बूला या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. त्यानंतर तब्बू तिच्या सिनेमातील कॅरेक्टरमूळे ओळखू जावू लागली.


नुकत्याच आलेल्या 'गोलमाल इज बॅक अगेन' या सिनेमात तब्बू दिसली. या सिनेमाने बॉक्सऑफीसवर हंगामा केला आहे. तब्बूने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिकाही केली आहे. तिला २ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही तिने पटकावला आहे.




२०११ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारने तिला गौरविले होते. तब्बूने तेलुगू, तामिळ, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीसह काम केले आहे.



तसेच आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. मीरा नायरचा 'नेमसेक' (2007) मध्ये ती लीड रोलमध्ये दिसली तसेच 'लाइफ ऑफ पाय' मध्ये सपोर्टिंग अॅक्टर म्हणूनही दिसली.