Birthday Special: शिवरायांसाठी अक्षय कुमारची निवड असो की POCSO; `या` कारणांमुळे नेहमीच वादात राहिले Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar Birthday: आज सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. गेली 20 हून अधिक वर्षे ते या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. परंतु महेश मांजरेकर हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. गेली चार एक वर्षे त्यांना याचा सामना करावा लागला होता.
Mahesh Manjrekar Birthday: महेश मांजरेकर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते, दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर आपल्या परिचयाचे आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. प्रेक्षकांना वेगळे सिनेमे देण्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर हे पारंगत आहेत. शिक्षणांच्या आयचा घो पासून ते वास्तव, नटसम्राट, पांधरूण अशा नानाविध चित्रपटांतून त्यांनी भुमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. महेश मांजरेकर हे नावं आणि वाद आला नाही असं आत्तापर्यंत झालेलं नाही. महेश मांजरेकर हे अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांच्या चित्रपटांमुळे ते अनेकदा वादात अडकले होते. यावेळी या लेखातून जाणून घेणार आहोत की महेश मांजरेकर आणि आतापर्यंत ते कुठल्या कुठल्या वादात अडकले होते.
अक्षय कुमार, छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपट
काही दिवसांपुर्वी महेश मांजरेकर यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपटाचा पहिली लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यादरम्यान या चित्रपटातील मावळ्यांच्या वेशभुषेवर आक्षेप घेण्यात आला होता. संभाजी छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती. आपले सर्व मुद्दे सांगण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदही भरवली होती. यावेळी या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेसाठी अक्षय कुमारचा फर्स्ट लुक समोर आला होता ज्यावर नेटकऱ्यांनी नापसंतीही दर्शवली होती.
'नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा' आणि POSCO गुन्हा
'नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटात लहान मुलांची आक्षेपार्ह अशी दृश्यं असल्याचे समोर आले होते. किंबहुना या चित्रपटाविरोधात महिला आयोगाच्या कार्यकर्त्याही पुढे आल्या होत्या व सोबतच या चित्रपटावर POSCO अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
'भाई व्यक्ती की वल्ली' आणि पु.ल.देशपांडे यांचा चुकीचे चित्रण
2019 साली महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बहुतांशी प्रेक्षकांना आवडला होता परंतु यावर काही जाणकारांनी, कलाकारांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटातून ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, वसंतराव देशपांडे यांचे चुकीचे चित्रण केले होते. त्यातून पु.ल.देशपांडे यांना आणि सोबतच भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांना दारू पिताना दाखवण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट, रणदीप हुडा आणि वाद
यावर्षी चर्चा आहे ती म्हणजे 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची. या चित्रपटातून रणदीप हुडा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भुमिकेतून दिसणार आहे. या चित्रपट महेश मांजरेकरही करत होते परंतु रणदीप हुडाचा वाढता हस्पक्षेप पाहता त्यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.