मुंबई : बॉलिवूडची ट्रेजडी क्वीन मीना कुमारी यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. १ ऑगस्ट १९३३ ला महजबी बानोच्या रुपात जन्मलेली ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये मीनाकुमारी या नावाने लोकप्रिय झाली. मीनाकुमारी या इकबाल बेगम आणि अली बक्श यांची तिसरी कन्या. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांकडे हॉस्पिटलची फिज भरायलाही पैसे नव्हते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसे नसल्याने त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अनाथालयात सोडले. पण मुलीच्या प्रेमाने त्यांना राहावले नाही आणि ते पुन्हा तिला घरी घेऊन आले. चार वर्षांची असल्यापासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली.



मीना कुमारी यांनी १९३९ मध्ये लेदरफेस सिनेमात बेबी महजबीची भूमिका साकारली होती. ३३ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ९२ सिनेमात काम केले. 



बॉलिवूडमध्ये तीन दशकांपर्यंत आपल्या अदांनी, अभिनयांनी प्रेक्षकांचे मनं जिंकणाऱ्या मीना कुमारींचे वैयक्तिक आयुष्य फार दुखी होते. त्यांची ती वेदना त्यांच्या अभिनयातून प्रतीत होत होती.



साहिब, बीबी और गुलाम, परिणीता, फूल और पत्थर, दिल एक मंदिर, काजल आणि पाकीजा सिनेमातील अभिनय नेहमीच स्मरणात राहणारा आहे. आपल्या घायाळ करणारे सौंदर्य, अदा आणि दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.



सर्वोतृष्ट अभिनेत्री म्हणून मीना कुमारी यांना फिल्मफेअरचे चार पुरस्कार मिळाले. १९६३ साली झालेल्या १० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्व नामांकन मिळवून त्यांनी इतिहास रचला.



मीना कुमारी यांनी फिल्ममेकर कमाल अमरोहीसोबत १८५२ मध्ये निकाह केला. ३१ मार्च १९७२ मध्ये फक्त ३८ वर्षांच्या असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला.



मीना कुमारींच्या वाढदिवसानिमित्त गुगलने आज सुंदरसं डूडल करुन त्यांची आठवण पुन्हा ताजी केली आहे. गुगलने आकाशातील चमचमत्या ताऱ्यांमध्ये लाल साडीतील मीना कुमारी दाखवली आहे.