मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहांने व्यावसायिक निखिल जैनसोबतचं आपलं लग्न अमान्य केलं आहे. (BJP Leader Dilip Ghosh ask how Nusrat Jahan wore sindoor being unmarried )  नुसरतने सांगितलं की,'तिचं आणि निखिलचं लग्न भारतात रजिस्टर नाही. यामुळे हे लग्न अमान्य आहे.' असं असताना आता नुसरतचं लग्नाशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरत जहांच्या माहितीनुसार त्यांच लग्न तुर्कीत झालं आहे. त्यांच लग्न अद्याप भारतात रजिस्टर झालेलं नाही. यामुळे भारतातील कोणतेह नियम या लग्नाला लागू पडत नाहीत. या वादादरम्यान भाजप नेता दिलीप घोष यांनी नुसरत जहाला घोटारडी म्हटलं आहे. दिलीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुसरत जहाने संसदेत विवाहित स्त्री म्हणून शपथ घेतली आहे. 


नुसरत जहा यांच्यावर निशाणा साधताना दिलीप घोष म्हणाले की,'ती फ्रॉड आहे. एका व्यक्तीला टीएमसी तिकिट देते. ती व्यक्ती शपथ घेते आणि आता असं म्हटलं जातं की, ती व्यक्ती विवाहित नाही. याव्यक्तीने कपाळावर सौभाग्याचं लेण असलेलं सिंदूर लावलं. पूजा केली आणि निवडणुक देखील लढवली.'


नुसरत जहां आणि निखिल जैनने 2019 साली लग्न केलं. या लग्नात रिसेप्शनमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होत्या. अशावेळी दिलीप घोष म्हणतात की,'जर एका व्यक्तीचं लग्नच झालं नाही तर ममता बॅनर्जी कुणाच्या लग्नाला गेल्या होत्या.' 2019 मध्ये निखिल जैन आणि नुसरत जहांने कोलकाताच्या ISCKON द्वारे आयोजित रथ यात्रेत सहभाग घेतला होता. तसेच संसदेत सिंदूर लावून पोहोचलेल्या नुसरत जहाने आपलं नाव नुसरत जहां, रूही जैन असं सांगितलं होतं.


मौलाना यांचा नुसरत जहांला पाठिंबा


नुसरतने हे लग्न अमान्य असल्याचं म्हटलं आहे. याला मौलाना कारी मुस्तफा देहलवी यांनी पाठिंबा दिला आहे. नुसरत जहांचं असं म्हणणं आहे की, दोन धर्मामध्ये झालेलं लग्न हे लग्न नाही आहे. जर दोन धर्मांच्या लोकांनी लग्न केलं तर ते लग्न त्या धर्मानुसार व्हायला हवं. हे लग्न मुस्लिम धर्माप्रमाणे व्हायला हवं. हे लग्न लग्न नसून विवाहबाह्य संबंध आहेत. याला वेगळा उपाय आहे.