pankaja munde,Unch Maza Zoka : झी मराठीच्या (Zee Marathi) नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवीन आणि प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन येत असते.गेली 7 वर्ष उंच माझा झोका(unch majha jhoka)  हा पुरस्कार सोहळा समाजातील  विविध स्तरात आपलं नाव उंच करणाऱ्या महिलांचा  सन्मान करणारा  असा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचं या पुरस्कार सोहळ्याचं 8वं वर्ष आहे 'मला अभिमान आहे'या ब्रीदवाक्याखाली यंदाचा पुरस्कार सोहळा पार पडतोय आपल्या कर्तृत्वाने समाजात योगदान देऊन समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. '


उंच माझा झोका'  या पुरस्कार सोहळ्याची यंदाची खासियत काही औरच आहे कारण यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे(pankaja munde) या सोहळ्याचं निवेदन करणार आहेत.त्यांच्यासोबत अभिनेत्री क्रांती रेडकर(kranti redkar) सुद्धा या सोहळ्यात निवेदन करेल. 


'उंच माझा झोका' या पुरस्कार सोहळ्याचा प्रोमो व्हिडीओ नुकताच झी-मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात दोघींमधला एक संवाद फारच इंटरेस्टिंग आहे, क्रांती रेडकर पंकजा मुंडेना म्हणते की, 'कदाचित या येथे भाषण करणार आहेत.' त्यानंतर पंकजा मुंडे या म्हणतात, 'मी भाषण नाही तर तुझ्यासोबत सूत्रसंचालन करणार आहे' 


येत्या रविवारी हा सोहळा आपल्याला पाहता येणार आहे शिवाय विविध कलाकार यात आपली कला सादर करणार आहेत त्यामुळे पाहणाऱ्यांसाठी ही  एक पर्वणीच असणार आहे.