सलमान खानसोबतच या 5 कलाकारांबाबत होणार मोठा निर्णय
गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणातील महत्वाचा निर्णय जोधपुर न्यायालय सुनावणार आहे. या प्रकरणात सलमान खानसोबतच आणखी 5 कलाकारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या कलाकारांबाबत काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे पाचही जण जोधपुरला पोहोचले आहेत.
मुंबई : गुरूवारी काळवीट शिकार प्रकरणातील महत्वाचा निर्णय जोधपुर न्यायालय सुनावणार आहे. या प्रकरणात सलमान खानसोबतच आणखी 5 कलाकारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या कलाकारांबाबत काय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे पाचही जण जोधपुरला पोहोचले आहेत.
सलमान खान अबू धाबी, दुबईमध्ये सिनेमा रेस 3 च्या शुटिंगवरून भारतात परतला आला. सलमान खान देखील आता जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. या प्रकरणाची अंतिम चर्चा 29 मार्च रोजी जोधपुर सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्रींनी केली आहे.
सलमानसोबतच तब्बू, सैफ, सोनाली, निलम यांच्यावर ऑक्टोबर 1998 मध्ये राजस्थानच्या कंकाणी गावात दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. यावेळी हे पाचही कलाकार 'हम साथ साथ है' या सिनेमाचं शुटिंग करत होते. सोनाली बेंद्रे सिनेमा प्रोड्युसर आणि आपला नवरा गोल्डीसोबत जोधपुरला पोहोचली आहे. आणि सलमान खान स्पेशल विमानाने गेलं असल्याचं म्हटलं जात आहे.
सलमान खानवर हे आहेत आरोप
तसेच बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी देखील आपला नवरा समीर सोनीसोबत जोधपुरमध्ये पोहोचली आहे. जोधपुरच्या काळवीट प्रकरणाबाबत विश्नोई समुदायाने लूणी पोलीस स्थानकात केस दाखल केली आहे. काळवीट प्रकरणाबाबत सलमान खान विरोधी 4 केस दाखल केली आहे. त्याच्यावर वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्ट आणि आर्म्स अॅक्टच्या अंतर्गत केस दाखल केली आहे. 31 ऑगस्ट 2017 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने सलमान खानला आर्म्स अॅक्टच्या अंतर्गत सोडवण्यात आलं होतं.