काळवीट शिकार प्रकरण : जोधपुर विमानतळावर तब्बूची काढली छेड
20 वर्षानंतर चर्चेत असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात आज महत्वाचा निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. यावेळी अभिनेत्री तब्बू देखील जोधपुर एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा तिच्या छेडछाडीला सामोरे जावे लागले.
मुंबई : 20 वर्षानंतर चर्चेत असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात आज महत्वाचा निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. यावेळी अभिनेत्री तब्बू देखील जोधपुर एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा तिच्या छेडछाडीला सामोरे जावे लागले.
काय घडला प्रकार
तब्बू जोधपुर कोर्टात पोहोचल्यावर तिच्या आजाबाजूला बाऊंसर्स होते. यावेळी तिच्या सिक्युरिटी गार्डने तिला घेरलं होतं. असं असताना देखील तब्बूचा एक फॅन जबरदस्ती त्यामध्ये घुसला आणि तब्बूसोबत गैरतवर्तणूक केलं. मात्र बाऊंसरने तात्काळ प्रसंगावधान राखत तिच्या फॅनला धक्का देऊन बाहेर काढलं.
ही व्यक्ती सातत्याने तिचा हात तब्बूच्या खांद्यावर ठेवत होती. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या या प्रकारामुळे तब्बूला चांगलाच संताप आला. तिने त्याला खडेबोल सुनावले. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला असून, त्यामध्ये तब्बू संबंधित व्यक्तीवर संतापताना दिसत आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे
किती वर्षांची शिक्षा?
ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.
काय आहे हे प्रकरण?
'हम साथ साथ हैं ' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.