पद्मावतीच्या समर्थनार्थ ब्लॅकआऊट
या सिनेमाला होत असलेल्या विरोधाच्या निषेधार्थ बॉलिवूडकरांनी `ब्लॅकआऊट` केला होता.
मुंबई : रणवीर आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भुमिका असलेला 'पद्मावती' या आठवड्यात रिलीज होणार होता. पद्मावती प्रकरणावरुन सुरु असलेल्या वादामूळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान या सिनेमाला होत असलेल्या विरोधाच्या निषेधार्थ बॉलिवूडकरांनी 'ब्लॅकआऊट' केला होता.
१५ मिनिटांचा ब्लॅकआऊट
आयएफटीडीएने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी पंधरा मिनिटांसाठी 'ब्लॅकआऊट' करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आज हा ब्लॅकआऊट पाळण्यात आला.
या काळात कुठल्याही प्रकारचं चित्रीकरण झालं नाही. १५ मिनिटाच्या या ब्लॅकआऊटला बॉलिवूडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सर्व आले एकत्र
गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये कलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन, टेक्निकल स्टाफ मोठ्या संख्येने एकत्र आले. साधारण ७०० ते ८०० जण यावेळी एकत्र आले होते.
तारीख पुढेच
रिलीजची जाहीर केली होती, पण चित्रपटाला होत असलेला विरोध आणि सेंसॉरबोर्ड प्रमाणपत्र न मिळाल्याने सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे.