अभिनेत्री चिन्मयी सुमितसमोर हस्तमैथुन करणारा विकृत अटकेत
अभिनेत्री चिन्मयी सुमीतसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : अभिनेत्री चिन्मयी सुमीतसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या विकृताला अटक केल्यावर चिन्मयीचा पती सुमित राघवननं मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. दुपारी ४.१५ वाजता एफआयआर दाखल केल्यावर पोलिसांनी दोन तासांमध्ये त्या विकृताला अटक केली. तुमच्यासमोरही असा प्रकार घडला तर पोलिसांकडे तक्रार दाखल करा, असं ट्विट सुमित राघवननं केलं आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
अभिनेता सुमित राघवनने आपली पत्नी आणि अभिनेत्री चिन्मयी सुमितसोबत घडलेला प्रकार ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. याबाबत सुमीत राघवनने पोलिसांना टॅग करून माहिती दिली होती.
एका बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरूवात केली. पार्ले टिळक शाळेजवळ ही गाडी उभी होती. चिन्मयी यांनी या विकृत प्रकाराबद्दल त्या व्यक्तीला हटकलेही. त्या मारण्यासाठी त्याला पुढे सरसावल्या असता त्या अज्ञात व्यक्तिने तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकारात चिन्मयी यांना त्या गाडीचे शेवटचे १९८५ हे ४ नंबरच टिपता आले. त्या चालकाने राखाडी रंगाचा सफारी घातला होता.
सुमित राघवनने हा सगळा प्रकार आपल्या ट्विटर अकाऊंटवरून समोर आणला होता. या संदर्भात त्याने मुंबई पोलिसांना देखील टॅग करून कळवलं. ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे पार्ले टिळक विद्यालय आहे.