मुंबई : 'आश्रम' सीरिजचे तीन भाग प्रदर्शित झाले. सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन, भ्रष्टाचार आणि राजकारण दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये 28 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला रिलीज होऊन 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी बाबा निरालाने सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर केला की, खुद्द बाबा निरालाने स्वतःच्या काळ्या कृत्यांची यादीच उघडली केली आहे. सध्या बाबा निरालेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे बाबा निरालाच्या या व्हिडीओवर बबितानेही कमेंट केली आहे. बाबा निराला यांनी हा व्हिडिओ शेअर करताच तो चर्चेत आला. बाबा निरालाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बॉबी देओलने व्हिडीओ शेअर करत बॉबी देओलने कॅप्शनमध्ये, 'फक्त शद्ध नाही, या भावना आहेत...' असं लिहिले आहे. शिवाय बॉबी देओलने हॅशटॅगमध्ये जपनाम असं लिहिलं आहे. 


बाबा निरालाच्या पोस्टवर बबिताची कमेंट
'आश्रम' वेब सीरिजमध्ये बाबा निरालासोबत इंटिमेट सीन देऊन एका रात्रीत चर्चेत आलेली बबिता म्हणजे अभिनेत्री त्रिधा चौधरीनेही बाबा निरालाच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. बबिताची भूमिका साकारणाऱ्या त्रिधा चौधरीने 'जपनाम.' अशी कमेंट केली आहे.